बिरसी येथील पुनर्वसन धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी एसडीओ कार्यालयात बैठक

0
14

गोंदिया-आ.विनोद अग्रवाल यांच्या उपस्थिती मध्ये बिरसी येथील पुनर्वसन धारकांच्या समस्या निराकरण करण्याकरीता उपविभागीय कार्यालय, गोंदिया येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये स्कुलटोली मध्ये असलेले मकानधारकांचे पट्टे बाबत तसेच पट्टे धारकांना शासनातर्फे देण्यात येत असलेल्या आवास योजनेच्या लाभ मिळण्याबाबत तसेच राज्यसरकारातर्फे कोणत्याही प्रकारची मदद असल्यास मदद करण्याची जवाबदारी माझी आहे असे आ.विनोद अग्रवाल बोलले. तसेच जो पर्यंत नवीन शाळेचे निर्माण होत नाही तोपर्यंत जुनी शाळा पाडली जाणार नाही.तसेच पुनर्वसन च्या जागी रस्ता निर्माण करीता कनिष्ठ अभियंता श्री.हरने यांना निर्देश दिले. सदर जागी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच मुलभुत सोयीकरीता निधी उपलब्ध करून देण्याचे ही आ.विनोद अग्रवाल यांनी आश्वस्त केले. व पुनर्वसन करीता त्वरित तोडगा काढण्यात यांवे व नवीन शाळाचे बांधकाम करीता त्वरित संबधित विभागाकड़े कार्यवाही करावी असे निर्देश प्रबंधक बिरसी विमानतळ यांना दिले. त्यावर त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. लवकरच त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल असे सभेच्या माध्यमातून दिसून आले.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तलाठी मैडम, सरपंच संतोष सोनवाने उपसरपंच उमेश पंडेले, बिरसी विमानतळ प्रबंधक गोस्वामी, रवि तावाड़े, उत्तमसिंह चौहान तसेच इत्यादी बाधित इस्म या दरम्यान उपस्थित होते.