एकच मिशन ..जुनी पेंशन घोषणेने दणाणले गोंदिया शहर,हजारोच्या संख्येत कर्मचारी सहभागी

0
87

गोंदिया, ता. १४ ः जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १४) बेमुदत संप पुकारला. या संपात जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ या घोषणा आंदोलक कर्मचारी देत होते.गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील आठही तालुक्यात तहसीलस्थळी कर्मचारी एकत्र जमले होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची हमी सरकार जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.हजारोच्या संख्येने निघालेल्या मोटारसायकल रॅलीने जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता हा जुन्या पेंशनच्या घोषणांनी दणादणून सोडला होता.

नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. नवीन पेन्शन योजने भविष्यातील पेन्शनची खात्री नाही, असे कर्मचाऱ्यांचे मत आहे. मात्र, पेन्शन व वेतनावर ६७ टक्के शासनाचा खर्च होतो, त्यामुळे आर्थिक संकट येईल, म्हणून सरकार जुनी पेन्शन देण्यास टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, नवीन पेन्शन योजना बंद करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन ही प्रमुख मागणी असली तरी सर्व
कंत्राटी अंशकालीन रोजंदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे,
सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बिनशर्त करण्यात याव्यात, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करण्यात येऊ नये, नवीन शिक्षण धोरण रद्द करण्यात यावे,
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरू करण्यात यावे, उत्कृष्ठ कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी, पेन्शनमध्ये अतिरिक्त वाढ करण्यात यावी, आदिवासी नक्षलग्रस्त भागात प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, शिक्षणसेवक, ग्रामसेवक यांच्या मानधनात वाढ करावी, शासकीय विभागाचे खासगीकरण, कंत्राटीकरण, महामंडळ करू नये, वेतन त्रुटीचे निराकरण करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

या संघटना संपात सहभागी
राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महसूल कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना, कृषी संघटना, आरोग्य, नर्सेस संघटना, पशुसंवर्धन, उपअधीक्षक भूमी अभिलेख संघटना, दुय्यम निबंधक संघटना, अन्नपुरवठा विभाग संघटना यासह अन्य संघटनाही संपात सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनात सहभागी नेतृत्व

आंदोलनात लीलाधर पाथोडे समन्वयक राज्य सरकारी निम्म सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती गोंदिया,मदनलाल चुरे जिल्हाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा गोंदिया,आशिष प्र रामटेके सहसचिव राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र,पी.जी.शहारे अध्यक्ष,सरचिटणीस शैलेष बैस जिल्हा परिषद महासंघ गोंदिया.मानद अध्यक्ष कार्तिक चव्हाण, कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना जिल्हा गोंदिया,चंद्रशेखर वैद्य जिल्हाध्यक्ष पाटबंधारे विभाग जिल्हा गोंदिया,शैलेश भदाणे राज्यध्यक्ष वनविभाग महाराष्ट्र,राकेश डोंगरे सचिव महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गोंदिया,राज कडव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गोंदिया,संदीप तिडके जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,ममता येडे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,संगीता भिसे जिल्हाध्यक्ष नर्सेस संघटना,सेवेन्द्रजी बोरकर विजुक्ता,महेंद्रजी बडे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,किशोर बावनकर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,लिपिक वर्गीय संघटनेचे संतोष तोमर, कार्याध्यक्ष सौरभ अग्रवाल, कोषाध्यक्ष सुभाष खत्री, जिल्हा संघटक संतोष तुरकर,अभियंता संघटनेचे इंजि. गोवर्धन बिसेन, सहकार्याध्यक्ष  यज्ञेश मानापुरे, सहसंघटक आनंद चर्जे,मनोज मानकर,चित्रा ठेंगरी, तेजस्विनी चेटुले,शिक्षक संघाचे केदार गोटेफोडे,शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार,शिक्षक नेते एस.यु.वंजारी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भगीरथ नेवारे आदी विविध संघटनेचे पदाधिकारीसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.