एकच मिशन,जुनी पेन्शनच्या घोषणांनी दणाणले अर्जुनी मोरगाव,आमगाव व सालेकसा

0
35

तालुक्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी.

मागणी पूर्ण होईपर्यंत मैदान न सोडण्याचा सर्व कर्मचाऱ्यांचा निर्धार..!

अर्जुनी मोरगाव,दि.14ः- जुनी पेन्शनच्या मागणीसाठी समन्वय समितीच्या माध्यमातून पुकारलेल्या बेमुदत संपात आज 14 मार्च रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (1982) लागू करण्याच्या मागणीसाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची अभूतपूर्व एकी दिसून आले.
संपात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयातील मैदानात एकत्र येण्याचे आवाहन समन्वय समितीकडून आवाहन करण्यात आले होते, यावेळी हजारो कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले होते, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत संपावर राहण्याचा निर्धार यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वय समितीच्या माध्यमातून केला आहे.
यावेळी संपात सहभागी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या संपाचे मागील काही दिवसापासून तालुकास्तरीय नियोजन समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सचिन शेळके व सचिव देव शेळके आणि संचलन रमेश संग्रामे यांनी केले.सर्व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावला व अफवांना बळी न पडता उद्या नव्या जोमाने आपल्या न्याय हक्क मागणीसाठी याच स्थळी ठीक 11=00 वाजता उपस्थित रहावे ही, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सालेकसा तालुक्यातही महसुल,जिल्हापरिषद,वन,आरोग्य व इतर कर्मचारी संघटनानी पेंशनकरीता आंदोलन केले.

आमगाव तालुक्यातही महसुल,जिल्हापरिषद,वन,आरोग्य व इतर कर्मचारी संघटनानी पेंशनकरीता आंदोलन केले.