शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
25

गोंदिया- शहरातील सिंधी कॉलनीतील रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर डुकराने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना 13 मार्च रोजी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.घटनेनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेत मुलाला केटीएस जिल्हा रुग्णालयात नेले.या घटनेनंतर १४ मार्च रोजी स्थानिक माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यासह जखमी मुलाचे नातेवाईक व काॅलनीतील नागरिकांनी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची भेट घेत शहरातील डुकरांचा वाढता त्रास थांबविण्याची मागणी केली.यावेळी जखमी मुलगा आरुष माखिजा, त्याची आई, माखिजा कुटुंबातील सदस्य,माजी नगरसेवक गुड्डू कारडा यांच्यासह या भागातील 6 ते 7 महिलांनी लवकरात लवकर डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.तसेच जिल्हाधिकाऱ्यांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले.