आ. कोरोटेंच्या प्रयत्नांना यशः  १९ कोटी चा विकास निधी मंजूर

0
26

देवरी, दि.१४ –विकासाकामांसाठी सदैव आग्रही असलेले आमगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या डांबरीकरण आणि खडीकरणासाठी आशियायी विकास बॅंकेकडून १८ कोटी ६८ लाख ८३ हजाराच्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशात मांडण्यात आलेल्या अंदाजपत्रकात रस्ते विकासासाठी करण्यात आली आहे.

राज्याच्या सुरू असलेल्या अर्थ संकल्पिय अधिवेशामध्ये आपल्या मतदार संघातील रखडेली कामे कशी मार्गी लावता येतील, या साठी आमदार कोरोटे यांनी अनेक प्रश्न लावून धरले होते. परिणामी, या मतदार संघातील तीन ही तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण आणि खडीकरणासाठी सुमारे १९ कोटी चा निधी खेचून आणण्यात यश मिळविले आहे.

यामध्ये देवरी तालुक्यातील धोबीसराड ते बोरगाव या ३.८५ किमी लांबीच्या रस्ता विकासासाठी  ३ कोटी १८ लाख १५ हजार, डोंगरगाव-टोयाटोला-चांदलमेटा या ४ किमी रस्तेविकासासाठी  ३ कोटी १५ लाख ८७ हजार, कडीकसा ते येडमागोंदी या ६.३ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ५५ लाख १५ हजार, सालेकसा तालुक्यातील पानगाव ते सोनपुरी या ५.८४ किमी रस्त्यासाठी ४ कोटी १० लाख ८८ हजार आणि आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा- आसोली- आंबेतलाव या ४.८५ किमी रस्त्यासाठी  ३ कोटी ६८ लाख ७८ हजार एवढ्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करून घेण्यात आ. कोरोटे यांना यश मिळाले आहे.