इन्पल्युएंझा HINI/H3N2 ची लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घ्या-आरोग्य विभागाचे आवाहन

0
25

भंडारा दि. 16: सद्यस्थितीमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. इन्पल्युएंझा HINI/H3N2 बाबत आरोग्य विभागाने लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले आहे.

 श्वसन संस्थेसंबंधी आजार (तीव्र श्वसन संक्रमण आजार ( SARI) आणि इन्फ्ल्यूएंझा सारखे आजार (III) ) होण्याकरीता Influenza A subtype H3N2 हे प्रमुख कारण आहे. भारतामध्ये विविध ३० ICMR / DHR स्थापीत लॅब मार्फत श्वसन संबंधीत विषाणूचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणावरुन इन्प-ल्यूएंझा H3N2 रुग्णामध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकुण श्वसन संबंधित आजाराच्या इन्फ्ल्यूएंझा सारखे आजार अंतररुग्णामध्ये व बाह्य रुग्णातील तीव्र श्वसन संक्रमण आजार रुग्णामध्ये जवळपास नीम्मे रुग्ण हे H3N2 दुषीत येत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

इन्पल्युएंझा HINI/H3N2 हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो गंभीर असू शकतो. खुप उशिर होण्यापुर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. इन्पल्युएंझा HINI/H3N2 सदृष्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जावून तपासणी व आवश्यक असल्यास उपचार सुरु करणे आवश्यक आहे.

संशयित इन्पल्युएंझा HINI/H3N2 वैद्यकीय वैशीष्टे –

Influenza A subtype H3N2 रुग्णाचे इतर Influenza subtype च्या तुलनेमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे.  रुग्णालयात भरती असलेल्या तीव्र श्वसन संक्रमण आजार ( SARI) चे रुग्ण जे Influenza A subtype H32 ने दुषीत आहेत त्यामध्ये ९२ % रुग्णामध्ये ताप, ८६ % रुग्णामध्ये खोकला, २७ % रुग्णामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, १६ % रुग्णामध्ये निमोनिया सदृष्य लक्षणे आढळून येत आहेत. एकुण तीव्र श्वसन संक्रमण आजार ( SARI) चे रुग्ण जे H3N2 दुषीत आहेत त्यापैकी १० % रुग्णांना ऑक्सीजन ची गरज आहे तर ७ % रुग्णांना ICU ची गरज पडत आहे.

इन्फ्ल्यूएंझा HINI/H3N2 रुग्णांमध्ये खालील लक्षणे आढळतात –

ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, अतिजोखमीच्या व्यक्तीला इन्पल्युएंझा HIN1 /H3N2 हा आजार ५ वर्षाखलील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके), ६५ वर्षावरील वरिष्ट नागरीक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदय रोग, मधूमेह, फुप्फुस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती, चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती, प्रतिकार शक्तींचा हास झालेले व्यक्ती, दिर्घकाळ रिस्टरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती व्यक्तींमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो.

इनफ्लूएंझा HINI/H3N2 टाळण्यासाठी शिकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकावे, आपले हात नियमितपणे आणि साबण आणि पाण्याने धुणे, टीश्यू पेपरचा पुनर्वापर टाळाख, हस्तांदोलन करणे टाळा, मास्कचा वापर करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा, स्वताहून औषधी घेणे टाळा, भरपुर द्रव्य पिणे, विलगीकरण राहणे, पौष्टीक आहार घ्या, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा.

आपल्या जिल्हयामध्ये सर्व शासकीय आरोग्य संस्था मध्ये (प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णपालय उपजिल्हा रुग्णालय) इन्पल्युएंझा HINI/H3N2 सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी व उपचार केल्या जातो. 13N2 विषाणूची लक्षणे दिसताच ७२ तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो.

इन्पल्युएंझा HINI/H3N2 सदृष्य लक्षणे असल्यास जवळच्या शासकीय आरोग्य संस्था प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अथवा सामान्य रुग्णालया येथे उपचारासाठी सुविधा उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दिपचंद सोयाम, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर यांनी कळविले आहे.