17 मार्च रोजी वाशीम येथे फेरीवाल्यांसाठी शिबिर

0
5
वाशिम दि.16 – वाशिम नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळालेल्या फेरीवाल्या लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबाला केंद्र सरकारच्या 8 योजनांचा लाभ देण्याकरिता स्वनिधी से समृद्धीअंतर्गत 17 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शहर उपजीविका केंद्र, युनियन बँकेच्या मागे, बालाजी संकुल पहिला माळा,पाटणी चौक, वाशिम येथे सर्व बँक व्यवस्थापकांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            ज्या कर्ज मिळालेल्या फेरीवाल्या लाभार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,प्रधानमंत्री जनधन योजना, इमारत व इतर बांधकाम कामगार योजना,प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,वन नेशन वन रेशनकार्ड या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
        ज्या लाभार्थी व कुटुंब सदस्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी से समृद्धी योजनेचे ऑनलाईन सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण पूर्ण केले नाही,त्यांनी तात्काळ सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे.लाभार्थ्यांनी लाभ मिळवून घेण्यासाठी आधारकार्ड,मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, फेरी व्यवसाय फोटो,आधार संलग्न मोबाईल क्रमांक आणि सर्वेक्षण केलेल्या अर्जाची प्रत आदी.कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा.असे आवाहन वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी केले आहे.