नागरिकांनो इन्फल्यूएंझा एच3 एन2 विषाणुची लक्षणे दिसतास वैद्यकिय मदत घ्या

0
10

कुठलाहि फ्लु सद्रुष्य सर्दी, ताप व खोकला असल्यास करू नका दुर्लक्ष
डॉ. नितीन वानखेडे , जिल्हा आरोग्य अधिकारी 
गोंदिया–देशातील अनेक राज्यात तसेच आपल्या राज्यातील काही जिल्ह्यात फल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या इन्फल्यूएंझा रुग्णामध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितित जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकल्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. म्हणुन लोकांनी सावधता बाळगणे गरजेचे बनले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन वानखेडे यांनी केले आहे.
सामान्य व्हायरल इन्फेक्शन तीन-चार दिवसात बरा होतो. मात्र, हल्ली व्हायरल इन्फेक्शन मुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण इस्पितळात भरती होत आहेत. आजारपणाचा आणि इन्फेक्शन नंतर अशक्तपणा जाणवण्याचा कालावधी वाढल्याची नोंद रुग्णालयांमध्ये होते आहे. हे इन्फेक्शन प्रामुख्याने एच3 एन2 या विषाणूमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहव्याधी असणाऱ्यांना या साथीचा धोका अधिक असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे. इन्फल्यूएंझा एच3 एन2 विषाणुची लक्षणे दिसतास 72 तासाच्या आत डोक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो निंयत्रणात येऊ शकतो असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
एक ते चार दिवसात याची लक्षणे दिसून येतात. कफ, ताप, गळ्याला सूज, सर्दी, अंगदुखी, थंडी वाजणे, अंग थरथरणे, अशक्तपणा आणि विशेषता लहान मुलांमध्ये उलटी व हगवण अशी लक्षणे आहेत. सहव्याधी असणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि उपचारामुळे इम्युनिटी कमी झालेले रुग्ण यांना या विकाराचा सर्वाधिक धोका असून प्रसंगी न्युमोनिया सारखी गुंतागुंत होऊ शकते, श्वसनप्रणाली बंद पडू शकते आणि जीव जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहीती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी दिली आहे.
अतिजोखमीच्या व्यक्ती इन्फल्यूएंझा एच3 एन2 विषाणु हा अतिजोखमीच्या खालील दिलेल्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूप धारण करु शकतो – इन्यल्युएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तिला होऊ शकते.मात्र या आजाराचा धोका खालील व्यक्तींना जास्त होवु शकतो.हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तिपासुन दुसर्या व्यक्तिला होवु शकतो.
१) ५ वर्षाखालील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके)
२) ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक.
३) गरोदर माता.
४) उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग.
५) मधुमेह स्थूलत्व.
६) फुप्फुस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती.
७) चेता संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती.
८) प्रतिकार शक्तीचा -हास झालेली व्यक्ती.
९) दीर्घ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती.
इन्फल्यूएंझा एच3 एन2 विषाणु  आजार कसा पसरतो-
हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तिपासुन दुसर्या व्यक्तिला होवु शकतो.जो गंभीर असु शकतो. खुप उशिर होण्यापुर्वी काळजी घ्या.

  • व्यक्ती ते व्यक्ती
  • खोकणे आणि शिंकणे यातुन श्वासाद्वारे
  • हात आणि पृष्ठभागावर पडलेले थेंब

इन्फल्यूएंझा एच3 एन2 फ्लु सदृश्य रुग्णाची लक्षणे (Influenza Like Illness-ILI)
श्वसन संस्थेचा नुकताच आजार झालेल्या व्यक्तीमध्ये खालील लक्षणे आढळतात्त
1) ताप 2) घसादुखी, घशाला खवखव 3) खोकला 4) नाक गळणे( सर्दी) 5) अंगदुखी 6) डोकेदुखी 7) इतर कोणतेही निदान झालेले नसणे.
बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. घसादुखी असणाऱ्या बाळामध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. काही रुग्णांना जुलाब उलटया होतात.
प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक वेळा ताप आढळत नाही.
तीव्र श्वसनदाह severe Acute Respiratory Illness- SARI) असलेल्या रुग्णांचे महत्वाचे लक्षणे –
५ वर्षावरील व्यक्तीमध्ये –  1) अचानक सुरु झालेला ३८0 पेक्षा  जास्त ताप 2) खोकला / घश्यात खवखव
                3)  धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे 4) रुग्णालयात भरती करण्याची
आवश्यकता  भासणे.
५ वर्षाखालील मुलांमध्ये –  1) न्यूमोनिया 2) रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता   भासणे
संदर्भित केलेल्या रुग्णांपैकी जे रुग्ण इन्फल्यूएंझा एच3 एन2 फ्लु बाधित आढळतील त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन त्यापैकी फल्यू सदृश्य लक्षणे असणा-या निकट सहवासिंताना लक्षणे नुसार उपचार देणे सुद्धा आवश्य्क असल्याची माहिति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली आहे..
निकट सहवासीतांचा शोध व उपचार –
इन्यल्युएंझा अधिशयन कालावधी हा १ ते ७ दिवसांचा आहे. इन्पल्युएंझा एच3 एन2 रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्यानंतर पुढील ७ दिवसांपर्यन्त इन्पल्युएंझा एच3 एन2 रुग्ण निकट सहवासितांमध्ये संसर्ग संक्रमित करु शकतो. त्यामुळे या कालावधीत इन्पल्युएंझा एच3 एन2 बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या निकट सहवासितांचा शोध घेणे आवश्यक असते.
निकट सहवासित कोणास म्हणावे बाधित रुग्णाच्या संसर्गजन्य कालावधीत रुग्णाच्या ६ फूटापेक्षा जवळ सहवासात आलेल्या व्यक्तीस निकट सहवासित म्हणावे.
प्रयोगशाळा चाचणी – संशयित फ्लु रुंग्णाचा कोविड प्रमाणे नाक अथवा घशातील स्त्रावाचा स्वॉब तपासणी करण्यात येतो.
इन्फल्यूएंझा स्वाईनफ्लु टाळण्यासाठी हे करा

  • शिंकताना आणी खोकताना नाक आणि तोंड झाका..
  • आपले हात वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
  • पौष्टिक आहार घ्या.
  • लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा.
  • धुम्रपान टाळा.
  • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
  • भरपूर पाणी प्या.
  • विलगीकरण रहा.

इन्फल्यूएंझा फ्लु टाळण्याकरता हे करु नका –

  • हस्तांदोलन करणे टाळा.
  • आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.
  • टिश्यु पेपरचा पुर्नवापर.टाळा.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
  • आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

नियमित मास्क वापरा . तसेच मास्कची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावल्याने संसर्ग वाढण्याची भीती असते. त्यामुळे कमीतकमी सर्वसामान्य जनतेने घडीचा रुमाल वापरणे अधिक योग्य आहे.
फल्यू रुग्णाची घरगुती काळजी-
बहुतांश फल्यू रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा फल्यू रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे माहित असणे आवश्यक आहे.
• घर मोठे असेल तर रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी.
• रुग्णाने शक्यतो बैठकीच्या खोलीत, ज्या ठिकाणी सर्व कुटूंबिय असतील तेथे येणे टाळावे.
• रुग्णाने स्वतः नियमित मास्क वापरा .
• रुग्णाची सेवा शक्यतो कुटूंबातील एकाच व्यक्तीने करावी..
• रुग्णाने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. •घरात ब्लिच द्रावण तयार करावे याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा.
•रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत.
• रुग्णाने वापरलेले कपडे अथवा रुमाल गरम पाण्यात ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ  धुवावेत.
• रुग्णाचे अंथरूण पांघरूण टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ ध्रुवावेत.
• रुग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी. आणि द्रव पदार्थ घ्यावेत.
• रुग्णाने धुम्रपान करु नये.
• डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
• दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात   निलगिरी
तेल मेंथॉल टाकून त्याची वाफ घ्यावी.
• ताप आणि फल्यूची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी रहावे.
•धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच
लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार उलटया अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविणे
आवश्यक आहे.