जाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सूचना

0
15

गोंदिया, दि.18 : बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षीत जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच सदर अभ्यासक्रमाची शिक्षण फीची प्रतीपूर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तथापी, इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी वेळेत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे दाखल करीत नाहीत, पर्यायाने अशा विद्यार्थ्यांना वरील सवलतीचा लाभ मिळत नाही.

सदर अडचण विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. परंतू सन 2022-23 या वर्षातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशीत काही विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत आपले जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव कार्यालयात सादर केलेले नाहीत, त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरुन सदर अर्जाची हार्ड कॉपी मुळ शपथपत्रासह दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे त्वरित सादर करावी.

डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात अनुसूचित जाती व नामाप्र प्रवर्गातील राखीव मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केले होते व जे उमेदवार आरक्षीत प्रवर्गातून (अनुसूचित जाती व नामाप्र) विजयी झालेले आहेत त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्तावासंबंधी संबंधीत उमेदवारांनी आरक्षीत प्रवर्गातून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र, त्यांचे जात प्रवर्गानुसार निर्धारित मानीव दिनांकापूर्वीचे/ त्या दिनांकास अनुसूचित जातीकरीता दिनांक 10 ऑगस्ट 1950, विजाभज करीता दिनांक 21 नोव्हेंबर 1961 व विमाप्र, इमाव करीता दिनांक 13 ऑक्टोबर 1967 ला जात व सर्वसाधारण अधिवास सिध्द करणारे पुराव्याचे व प्रकरणात दाखल कागदपत्रांचे सर्व मुळ प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, गोंदिया येथे तात्काळ संपर्क साधावा.

तसेच ज्या अर्जदारांनी आपले अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया या कार्यालयात 3 ते 4 महिन्यापूर्वी जमा करुनही त्यांचे जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव कार्यालयाकडे त्रुटी पुर्ततेकरीता प्रलंबीत आहेत व ज्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे त्रुटी पुर्ततेसंबंधी ई-मेलवर/पत्राद्वारे/एसएमएस द्वारे कळविण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकरणात त्रुटी पुर्ततेसंबंधाने आवश्यक ते पुरावे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया कार्यालयाकडे तात्काळ सादर करावे, जेणेकरुन त्यांचे प्रकरणावर तातडीने निर्णय घेणे सोईचे होईल. असे उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी कळविले आहे.