देसाईगंजचे ठाणेदार महेश मेश्राम यांची उचलबांगडी

0
43

अनेक प्रकरणात ठरले होते वादग्रस्त

देसाईगंज दि २०-मागील सहा महिन्यांपासून या ना त्या कारणाने सतत वादग्रस्त ठरलेले देसाईगंजचे ठाणेदार महेश मेश्राम यांची पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तातडीने उचलबांगडी करून सध्या देसाईगंज पोलीस स्टेशन चा प्रभार किरण रासकर यांच्या कडे देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

मागील साडे पाच वर्षांत सहाही प्रभारी अधिकारी यांच्या कारभारावर वरिष्ठ अधिकारी संतुष्ट नसल्याने गडचिरोली मुख्यालयात जमा व्हावे लागले होते. ३० मार्च २०२१ पुर्वी दोन वर्ष सहायक पोलीस निरिक्षकाच्या भरवशावर होते. त्यानंतर देसाईगंज पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा नियमित पोलीस निरीक्षकांनी पदभार ग्रहण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांनाही पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले. त्यांच्या ठिकाणी गडचिरोलीवरुन पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांची प्रशासकिय कारणास्तव ३१ ऑगस्ट २०२१ ला देसाईगंज पोलीस स्टेशन मध्ये यांची बदली करण्यात आले आहे.

यातील मागील एक वर्ष कोरोणा विषाणूंच्या आपत्ती व साथरोग व्यवस्थापनात गेला असला, तरी नजीकच्या सहा महिन्यांपासून देसाईगंज पोलीस स्टेशनला भंडारा , गोंदिया व चंद्रपुर जिल्ह्याच्या सिमा लागुनच असुन गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणुन ओळखल्या जाते. अवैद्य दारू विक्री व्यवसाय, सट्टापटी, कोंबड बाजार,हॉय प्रोफाईल गुन्हेगारीचे केंद्र आहे. मागच्या सहा महिन्यांत ११ ऑक्टोबर २०२२ ला आशिष मेश्राम याचा तर ६ डिसेंबर २०२२ ला करण कोवे याचा निघृण खून झाला होता. या दोन्ही घटना देसाईगंज शहराच्या हद्दीत घडल्या हे विशेष. त्यामुळे देसाईगंज पोलीसांचे गुन्हेगारांवर भिती राहिली नसल्याचे बोलले जात असुन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देसाईगंज तालुक्यासह संपूर्ण शहरात जागोजागी अवैद्य दारू व्यावसायिकांनी परवानेच असल्यासारखे बेधड़क खुलेआम दारू विक्री करित असुन एकही मोठी कारवाई झाली नसून मुख्य बाजार विभागात किराणा दूकानासारखे जागोजागी अवैद्य सट्टा बाजार शूरू आहे. तालुक्यासह देसाईगंज शहरातील मुख्य बाजारात सट्टा पट्टीचे जाळे पसरविले असुन अजगरी विळख्यात अडकलेला आहे.