संघर्ष समितीने उभारली समस्यांची गुढी

0
26

#आंदोलनाचा दुसरा दिवस

# नगर परिषदेच्या न्यायप्रविष्ट प्रकरणावरून नागरिक संतप्त

आमगाव:-आमगाव नगर परिषदेच्या शासनाद्वारे सर्वोच्य न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी घरकुल,शौचालय,रोजगार,पाणी प्रश्नावर गुढी उभारून त्यावर समस्यांचे फलक,मॉडेल लावून शासनाचे लक्ष वेधले.
राज्य शासनाने न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने नगर परिषद मधे प्रशासक कारभार सुरू ठेवला आहे.यामुळे प्रलंबित न्यायप्रविष्ट असल्याने लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नसल्याने व योजना विकास निधी मंजूर
करण्यात आले नाही त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही.नगर परिषद मधील आमगाव,बनगाव,किडंगीपार,माली,पदमपुर,कुंभारटोली,बिरसी, रिसामा ,या आठ गावांना राज्य सरकारने न्याय मिळवून देण्यासाठी नागरिक सहभागाने नगर परिषद संघर्ष समितीने मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरणाचा मागणी नंतर मुंडन मोर्चा,जण आक्रोश मोर्चा यापूर्वीच करून शासनाचे लक्ष वेधले होते, परंतु या आंदोनलची शासनाने दखल घेतली नाही.त्यामुळे नागरिक आता संतप्त होऊन मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अनिश्चित कालीन उपोषण तहसील कार्यालय समोर २१ मार्च पासून सुरू केले आहे.
आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषण कार्यकर्त्यांनी समस्यांची गुढी उभारली यावेळी रवी क्षीरसागर, यशवंत मानकर,संजय बहेकार,उत्तम नंदेंस्वर,नरेशकुमार माहेश्वरी,जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे ,कमलबापू बहेकार यांनी नागरिक सहभागाने समस्यांची गुढी उभारून समस्यांची घोषणाबाजी केली.यावेळी अजय खेताण,रामेश्वर श्यामसुंदर, पिंकेश शेंडे,प्रा.व्ही.डी. मेश्राम,महेश उके, युवराज उपराडे,ज्योती खोटोले,दिलीप टेंभरे,आनंद भावे,घनश्याम मेंढे,जगदीश शर्मा,रवी अग्रवाल, रितेश चुटे,उज्वल बैस,सीमा शेंडे,तुलेंद्र कटरे प्रमोद शिवणकर,पुरुसोत्तम चुटे,विनोद खंडेलवाल,संपत सोनी,संभू प्रसाद अग्रीका ,जीवन टावरी, रामेश्वर श्यामकुवर, घनश्याम अग्रवाल,रमण डेकाटे,नंदकिशोर कोरे,राजीव वंजारी यांनी साखळी उपोषनाला मार्गदर्शन केले. यावेळी नागरिक उपस्थित होते.