राणी अवंतीबाई लोधी राष्ट्रीय गौरव

0
21

गोंदिया : इंग्रज राजवटीला हादरवून सोडणार्‍या लोधी राणी अवंतीबाई एक वीरपत्नी होत्या. इतिहासकारांनी या धाडसी महिलेच्या हिंमतीला हवी तशी प्रसिद्धी दिली नसावी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील राणी अवंतीबाईंचे योगदान विसरता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी राणी अवंतीबाई या अमर हुतात्मा आहेत, त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले पाहिजे. राणी अवंतीबाई केवळ लोधी समाजाच्याच नाही देशाच्या गौरव आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील पाटीलटोला/रतनारा येथे लोधी क्षत्रिय समाजातर्फे राणी अवंतीबाई यांच्या १६५ व्या हुतात्मा दिनी आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला छाया दसरे, अर्जुन नागपुरे, प्रकाश रहमतकर, धनलाल ठाकरे, गुलशन अटरे, पंस सदस्य निखिल चिखलोंडे, सरपंच सतीश दमाहे, चैनलाल लिल्हारे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी नागपुरे म्हणाले, ब्रिटीश सैन्याशी लढा देऊन स्वबळावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा बिगुल बुलंद करणार्‍या शूर राणी अवंतीबाईंच्या हौतात्म्याचे सदैव स्मरण ठेवावे. यावेळी आदिवासी लोकला स्पर्धा घेण्यात आली. थ्द्प्ग् स्पर्धेतील विजेत्यांना अग्रवाल यांच्यातर्फे सडक अजुर्नी तालुक्यातील दोडके येथील संघाला प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला उत्तम देकरवार, दिनेश लिल्हारे, लक्ष्मीचंद लिल्हारे, फागुलाल लिल्हारे, सतीश दमाहे, योगीप्रसाद धामळे, ललिता उईके, रेखा चिखलोंडे, ओमेश्‍वरी ढेकवार, सिमा मोहरे, किरण डोहरे, कौशल्या डोंगरे, दयवंती लिल्हारे, मयाराम दसरे आदींसह समाजबांधव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.