पोलीस अधिकारी व कुटुबियांकरीता आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
8

गोंदिया,दि.24ः– जिल्ह्यातील पोलीस अधिकारी – पोलीस अंमलदार, आणि कुटुंबियांकरिता पोलीस उप- मुख्यालय देवरी येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 23 मार्च रोजी करण्यात आले होते.सदर शिबीरात नाडी परिक्षण, मधुमेह तपासणी, रक्तदान तपासणी, नेत्र तपासणी, बी. एम. आय / ई. सी.जी. तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, सामान्य आहारा बाबत सल्ला अशा विविध प्रकारच्या मोफत तपासणी करण्यात आल्या. सदर शिबीरात एकुण ९१ पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला असुन आरोग्य तपासणी शिबीरात सहभाग घेणाऱ्यांना वर्षभर मोफत आरोग्य विषयक सल्ला देण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत असतात, कर्तव्य पार पाडतांना त्यांना ताण- तणाव येऊन विविध प्रकार चे आजार जडले जातात, त्यांचे शरीर निरोगी राहावे या संकल्पनेतुन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली आयुर्वेद लाईफ केअर हेल्थ सेंटर, मुंबई यांचे तर्फे देवरी येथे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर शिबीरात आयुर्वेद लाईफ केअर हेल्थ सेंटर, मुंबई येथील डॉ. पि. एस. देसाई, नॅचरोपॅथी दिपक मोरे, पीआरओ- दिपक सोनवणे, डीएमएलटी बिट्टू सिंह, टेक्निसयन मासुम शेख व संकेत रावणम यांनी सहकार्य केल्याबद्दल गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले. सदर शिबीरात अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प देवरी)  अशोक बनकर, ठाणेदार पो.स्टे. देवरी प्रविण डांगे, सपोनि विठ्ठल करंब ळकर,पोउपनि संतोष बहाकर त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हयातील पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय मोठया संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोहवा हिरालाल घरत यांनी केले. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्याकरिता ठाणेदार पो. स्टे. देवरी प्रविण डांगे, पोहवा. हिरालाल घरत, नितीन शिरपुरकर, देवचंद नेवारे, राज वैद्य, घनश्याम मेंढे, निलेश जाधव, नापोकॉ- पंकज पारधी, शंकर सिंगाडे यांनी अथक परिश्रम घेतले.