ओबीसी सेवासंघाने केले भगतसिंगांना अभिवादन!

0
15

आमगाव: इंग्रज राजवट उलथून टाकून भांडवलशाही ऐवजी शेतकरी कामगारांचे लोकशाही समाजवादीराज्य निर्माण व्हावे म्हणून स्वातंत्र्यासठी बलिदान देणारे शहीदे-आझम भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांना ओबीसी सेवा संघ आमगावने अभिवादन केले.
अभिवादन सभेचे अध्यक्ष ओबीसी सेवांघाचे जिल्हाअध्यक्ष बी. एम.करमकर, सावन कटरे, एड. एस. डी.बागडे,दीपक मेंढे,बाळू वंजारी, उल्हास तागडे,लोकेश लांडगे, दिनेश तिरेले, शैलेंद्र टेंभुर्णीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी क्रांतिकारक भगतसिंग यांना अभिप्रेत असलेले समाजवादी लोकशाहीचे राज्य जरी संविधानात असले तरी आजही आपण निर्माण करू शकलो नाही. जातीवादी भांडवलशाहीला जर राज्य सोपवलं तर स्वातंत्र्याला अर्थ राहणार नाही,असे स्वातंत्र्य भगतसिंग यांना नको होते.म्हणून आज आपण भगतसिंगांना अभिवादन करताना जातीवादी भांडवलशाही विरुद्ध लढल्या शिवाय समाजवादी लोकशाही प्रस्थापित करण्याचा संकल्प केला पाहिजे, आजच्या तरुण पिढीने भगतसिंग यांच्या विचार व कर्या पासून प्रेरणा घ्यावी.तेव्हांच शहिदांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राहील,असा इशारा ओबीसी सेवासंघाचे राज्य संघटन सचिव यांनी दिला.दीपक मेंढे यांनी “नशिबावर विशंभून असणारे नामर्द असतात,तर कर्तुत्वावर विश्वास ठेवणारे खरे मर्द असतात “या भगतसिंगांच्या वैज्ञानिक विचारांतून त्यांच्या जीवनातील प्रंगतून देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. अध्यक्षीय भाषणातून बी. एम.करामकर यांनी क्रांतिकारक महापुरुषांमुळे मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. संवैधनिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठि सर्व मागासवर्गीय समाजाने एकत्रित येवून लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे,नाही तर खाजीकरणाच्या मध्यमातून भांडवल शाही देश गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा दिला . कार्य्रमाचे संचालन विनायक येडेवार यांनी तर उपस्थितांचे आभार प्रकाश ब्राह्मणकर यांनी मानले.