माली संभूटोला मार्गावर टायर जाळून रस्ता रोखला

0
18

आमगाव नगर परिषद न्याय प्रविष्ट प्रकरणावरून आठ गावे पेटून उठले

आमगाव:-राज्य सरकारने आमगाव नगर परिषदचा न्यायालयीन प्रकरण निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात आता गाव पेठुन उठले आहे.नागरिक संतप्त होऊन परिक्षेत्रातील गावांमध्ये नागरिक रस्त्यांवर टायर जाळून रस्ता रोखून आंदोलन करीत आहेत.
दिनांक २५ मार्चला सायंकाळी नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळून मार्ग रोखून धरला होता.नगर परिषद आमगाव येथील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरण निकाली काढावे या मागणीला घेऊन सलग आठ वर्षांपासून संघर्ष समितीने राज्य सरकारकडे अनेक निवेदने देऊन न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला परंतु राज्य सरकार न्याय देत नसल्याने अखेर संघर्ष समिती ने अनिक्षित कालीन साखळी उपोषण २१ मार्च पासून तहसील कार्यालय समोर सुरू केले आहे.
आंदोलन सुरू होताच नागरिकांनी राज्य सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सरकारला विरुद्ध प्रतिकात्मक आंदोलने सुरू केले आहे.या आंदोलनात नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावे पेठून उठले आहे.नगर परिषद संघर्ष समितीने माली गावात सभा घेतली यावेळी रवी क्षीरसागर, यशवंत मानकर,संजय बाहेकर, उत्तम नंदेश्वर,मुन्ना गवली, रामेश्वर श्यामकुवर यांनी नागरिकांच्या समस्येवर मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर केले.सभा निवळताच नागरीकांनी आपल्या हक्कासाठी लढा उभारत नागरिकांनी पुढाकार घेऊन माली संभूटोला मार्गावर टायर जाळून रस्ता रोखून धरला होता.यावेळी नागरिकांनी शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हल्लाबोल केला.व न्यायप्रविष्ठ प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रखर आंदोलनलनाची सुरवात केली.