यावलकर समितीच्या सिफारशी साठी तिव्र आंदोलनाचा निर्धार

0
43

:ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा अधिवेशन संपन्न:

गोंदिया,-यावलकर समितीच्या सिफारिशी मान्य करवुण नगर पालिका, नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, पेंशन आकृतीबंध पुनर्निर्धारित करणे, व वेतनावर सरकार द्वारे शंभर टक्के अनुदान ईत्यादि न्यायपूर्ण मागण्यांसाठी राज्यभर तिव्र आंदोलनाचे निर्धार करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) चे जिल्हा अधिवेशन भवभुती रंगमंदिर गोंदिया येथे जिल्हाध्यक्ष चत्रुघन लांजेवार यांचे अध्यक्षतेत तथा महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियनचे महासचिव कॉ.शिवकुमार गनवीर यांचे उद्घाटकीय भाषणाने सुरूवात झाली.प्रामुख्याने राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष काॅ.मिलिंद गनविर, सचिव निलकंठ ढोके (अमरावती), हौसलाल रहांगडाले(राज्य उपाध्यक्ष आयटक),रामचंद्र पाटील (जिलासचिव आयटक),करूना गनविर (शालेय पोषन आहार कर्मचारी युनियन),शालुताई कुथे,वर्षा पंचभाई (आशा,गटप्रवर्तक कर्मचारी युनियन),सुकदेव शहारे (जिला कार्याध्यक्ष)यांचे प्रमुख ऊपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रस्तावना रविंद्र किटे (सचिव) यांनी मांडली व कार्यक्रमाचे आभार महेंद्र कटरे यांनी मानले. अधिवेशनात जिल्ह्तील कर्मचाऱ्यांच्या अड़चणी ,मागण्यां व निवारणावर चर्चा करण्यात आली.तथा पुढ़ील वर्षा करिता 41 सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची सर्वसम्मतीने निवड़ करण्यात आली. यात चत्रुघन लांजेवार (अध्यक्ष),महेंद्र कटरे(कार्याध्यक्ष),मिलिंद गनविर (महासचिव),महेंद्र भोयर (कोषाध्यक्ष),रविंद्र किटे(सचिव),विष्णु हत्तीमारे (संघटन सचिव),ईश्वरदास भंडारी(ऊपाध्यक्ष)अशोक परशुरामकर, आशिष ऊरकुड़े (ऊपाध्यक्ष), बुधराम बोपचे, खोजराम दरवड़े ((सहसचिव)महिला प्रतिनिधीमध्ये दिप्ती राणे, संगीता चौरे, संगीता गावड़,सुनिता ठाकरे,चांदनी शहारे यांचा शमावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी आयोजन समितीचे विनोद शहारे,सुनिल शहारे,मोहन डोंगरे,भाऊराव कटंगकार, सुनिल लिल्हारे,देवेन्द्र मेश्राम, माणिक ऊके, श्याम कटरे,मुकेश बिसेन, राजेश भोकासे,जगदिश ठाकरे सुनंदा दहिकर, यशवंत दमाहे,दुर्गेश न्यायकरे ईत्यादिनी प्रयत्न केले.