तालुका आरोग्य कार्यालय गोंदियाद्वारे जागतिक क्षयरोग दिनी जनजागृती रॅलीचे आयोजन

0
13

गोंदिया, दि.२९ : 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त तालुका आरोग्य कार्यालय गोंदिया येथून शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी उपस्थित गांवकऱ्यांना क्षयरोगाविषयी सविस्तर माहिती देऊन रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळा फुलचूर येथील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, प्राथमिक आरोग्य केंद्र खमारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शहजादा हन्फी, उपकेंद्र फुलचूर सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.सोनाली गौतम, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती तसेच तालुका नियंत्रण पथक गोंदिया येथील तालुका आरोग्य सहाय्यक एस.बी.जवंजार, तालुका लेखापाल संजय मेंढे, कनिष्ठ सहाय्यक दिनेश बिसेन, तालुका कार्यक्रम सहाय्यक प्रिती लोणारे, तालुका आशा समन्वयक अविनाश वऱ्हाडे, निमवैद्यकीय कर्मचारी (कुष्ठरोग) रविंद्र जाधव, डीईओ-कम अकाउंटंट वैशाली टेंभूर्णे, डीईओ निसरत शेख व प्रितेश मेश्राम या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सामाजिक संस्था व समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती (दानदाता) यांना प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान योजनेअंतर्गत सर्व क्षयरुग्णांना सकस आहार देण्याकरीता आवाहन केले. यामध्ये प्रामुख्याने गहु/बाजरी 3 किलो, डाळ 1.5 किलो, खाद्य तेल 250 ग्रॅम, दुध पावडर 2 किलो इत्यादी देऊन सहाय्य करता येते असे सांगितले.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय अथवा संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास समक्ष अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वरिष्ठ पर्यवेक्षक (क्षयरोग) हरिष चिंधालोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उर्मिला बघेले यांनी मानले.