नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा १२ हजार ४७८ शेतकऱ्यांना लाभ

0
15
 ३२ कोटी ९० लक्ष रुपये अनुदानाचे वितरण
 १३७७ शेतकऱ्यांना फळबाग तर ५८९९ शेतकऱ्यांना तुषार संच वाटप
वाशिम दि.३०-अलीकडच्या काळात हवामानात झालेल्या लक्षणीय बदलांमध्ये कृषी क्षेत्रापुढे मोठी आव्हाने उभी राहत आहे.हवामान बदलानुकूल कृषी विकासाकरिता तसेच प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना घटत्या उत्पन्नामुळे तणावग्रस्त न होता पूर्वीच्या सुस्थितीत ताबडतोब पुनर्स्थापित होता यावे म्हणून कृषी क्षेत्र व पर्यायाने शेतकऱ्यांनी सक्षम व्हावे यासाठी हवामान अनुकूल कृषी प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) जिल्ह्यातील १४९ गावातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे.या गावातील १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना विविध २८ घटकांचा लाभ देऊन त्यांच्या बँक खात्यात ३२ कोटी ९० लक्ष ७६ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
              अवकाळी पाऊस व गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. परिणामी तीव्र दुष्काळ किंवा टंचाईसदृश्य परिस्थिती होवून त्याचा परिणाम कृषी उत्पादन व उत्पादकतेवर मोठ्या प्रमाणात होवून कृषी विकासाचा दर लक्षणीयरित्या घटत आहे.घटत्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांनी तणावग्रस्तता वाढत असून काही शेतकऱ्यांनी आत्महत्येच्या टोकाचे पाऊल देखील उचलले आहे.अशाप्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी हा प्रकल्प संबंधित गावांसाठी संजीवनी देणारा ठरत आहे.
       नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जिल्ह्यातील १४९ गावाच्या १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना ३२ कोटी ९० लक्ष ७६ हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. सर्वाधिक ५८९९ शेतकऱ्यांना तुषार संचाचा तर १३७७ शेतकऱ्यांना फळबाग योजनेचा लाभ देण्यात आला.
            वृक्ष लागवड करणाऱ्या        शेतकऱ्यांची संख्या ३४ असून मधुमक्षिका पालन करणारे २०, परसातील कुक्कुटपालन करणारे २, बांबु लागवड करणारे ३, सामुदायिक शेततळे ६,व्यक्तिगत शेततळे ६, विहिरीचा लाभ १११,ठिबक संचाचा लाभ १०६१,शेततळे अस्तरीकरण ४, शेतीशाळा होस्ट फार्मर ४४४,कृषी यांत्रिकीकरण १०७,नाडेप १,पाईप ६७८, फळबाग १३७७, पॉली हाऊस १, बीजोत्पादन १८०२, बीबीएफ तंत्रज्ञान प्रोत्साहन ५२, विहीर पुनर्भरण ७२ रेशीम उद्योग ३, शेडनेट हाऊस १३, शेळीपालन ३१, तुषारसंच ५८९९ आणि पंप संचाचा ७५१ अशा एकूण १२ हजार ४७८ शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत पोकरा प्रकल्पांतर्गत लाभ देण्यात आला आहे.
         पोकरा प्रकल्पात येणाऱ्या या गावातील शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या कृषी उत्पादन व उत्पादकतेत वाढ करून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोकरा प्रकल्पाचा हातभार लागत आहे.