महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्षपदी कैलास हांडगे यांची वर्णी.

0
20

अर्जुनी मोरगाव: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अर्जुनी मोरगावची सहविचार सभा यश अध्यापक विद्यालय येथे पार पडली, यासभेत नवीन तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.
नवनियुक्त कार्यकारिणीचे गठन शिक्षक संघाचे राष्ट्रीय संघटक नूतन बांगरे, जिल्हा नेते वीरेंद्र कटरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. तालुक्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच शिक्षकांना अडीअडचणीच्या वेळी कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हा नेहमी तत्पर असतो. अर्जुन मोरगाव तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न हाताळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड या सभेमध्ये करण्यात आली, नवनियुक्त तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे;कैलास हांडगे (अध्यक्ष),रमेश संग्रामे (शिक्षक नेते),शालिक गावळ (कार्याध्यक्ष),चंद्रशेखर गभणे (कार्याध्यक्ष),किर्तीवर्धन मेश्राम (उपाध्यक्ष),किशोर लंजे (सरचिटणीस), प्रशांत चव्हाण (सह सरचिटणीस ),प्रकाश सांगोळे (तालुका संघटक),मोरेश्वर राऊत (तालुका संघटक),नितीन तिडके (संपर्कप्रमुख), राजेश मरगडे (संपर्कप्रमुख),नरेश वावरे (कोषाध्यक्ष),अरुण फाये (कोषाध्यक्ष),निरज बिसेन (प्रसिद्धी प्रमुख), अमोल चौरे (प्रसिद्धी प्रमुख) यांची एक मताने निवड करण्यात आली. याच सभेत जिल्हा कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे;अरविंद नाकाडे,सदानंद मेंढे, भुवन औरासे,राजेश साखरे,गजानन रामटेके,भास्कर लेंढे,युवराज खोब्रागडे,पवन कोहळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेला प्रमुख अतिथी हेमंत पटले, प्रभाकर मेश्राम, मोरेश्वर बडवाईक, सुरेश वाघाडे, विजय डोये,योगेश्वर मुंगुलमारे,राजेश रामटेके,जितेंद्र गणवीर,गौरीशंकर टेंभरे, सुरेश मेश्राम हे होते. ही सभा तालुक्यातील शेकडो शिक्षक-शिक्षिका यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेचे सूत्रसंचालन रमेश संग्रामे यांनी केले व आभार किशोर लंजे यांनी मानले.