जि.प.सभापती संजय टेंभरे यांनी रखरखत्या उन्हात जाणून घेतल्या समस्या

0
33

* फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक ठिकाणी भेटी देऊन पाहणी
गोंदिया – क्षेत्रातील नागरिकांना येत असलेल्या अडचणी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रखरखत्या उन्हात जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी आज दिनांक 30 मार्च रोजी फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रातील फुलचुर व फुलचुर टोला या भागात भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या.
फुलचुर जिल्हा परिषद क्षेत्रातील फुलचुर व फुलचुर टोला या ग्रामपंचायती शहरालगत आहेत. अनेक नोकरदार व व्यापारी वर्ग या भागात वास्तव्यास राहत असल्याने या निमशहरी भागात हव्या त्या सुविधा नसल्याने अनेक समस्या उद्भवतात. ग्रामपंचायतीचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नागरिकांना होत असलेल्या अडचणी व येणाऱ्या अडचणी बाबत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पासून जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी फुलचुर व फुलचुर टोला भागातील अनेक ठिकाणी भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. फुलचुर टोला येथील साई माऊली कॉलनी येथे भेट देऊन पाहणी केली असता नागरिकांनी सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते, पूल याबाबत समस्यांचा पाढा वाचला. यावेळी जिल्हा परिषद सभापती संजय टेंभरे यांनी समस्या जाणून घेत लगेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ समस्या सोडविण्या संदर्भात सूचना दिल्या. यावेळी मंगेश काहळकर, विश्वनाथ कोरे, धनिराम डोये, धनराज कृपाले, धनंजय लारोकर, गोपीचंद दोनेकर, संजय अग्रवाल, लोकेश काहळकर, भागवत तरोणे, गिरधर बोहरे, सेवकराम देशमुख, सत्याजिराव बारसे, विलास फुलबंधे, राजेंद्र खवासे, प्रतिभा चुटे, ललिता ताराम, पूजा कोरे, रोशनी काहळकर, ज्योत्स्ना लारोकर, सुनीता बारसे, नेहा दोनेकर, वर्षा बारसे, सुनीता तुपकर, ज्योती पटले, मुनेश्वरी बिसेन आदी उपस्थित होते.