देवेंद्र फडणवीस यांनी केले ऊर्जा भारतीय यांचे अभिनंदन

0
13

नागपूर : देशात जी-२० अंतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक भूमिका मांडणाऱ्या विविध समित्यांची निर्मिती झाली आहे. या अंतर्गत युवकांसाठीचे व्यासपीठ असलेल्या वाय -२० तर्फे युवककेंद्रित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून महाराष्ट्र आणि गोवा राज्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी ‘कार्यक्रम समन्वयक’ म्हणून ऊर्जा भारतीय यांना नियुक्त करण्यात आले आहे.
ऊर्जा भारतीय या ‘युवा तर्पण’च्या सीइओ असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांच्या विविध उपक्रमांमध्ये विशेषतः अनाथ युवकांच्या विविध समस्यांवर उपाययोजना शोधून त्यावर विविध सत्र, कार्यक्रम सक्रियपणे आयोजित करीत असतात.
वाय -२० सचिवालयाकडून ऊर्जा भारतीय यांना अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे. नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा भारतीय यांचे अभिनंदन करण्यात आले.