जलजीवन मिशनमुळे जिल्हा समृद्ध होणार : खा. मेंढे

0
22

गोंदिया-जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेंतर्गत कटंगटोला येथे ७0 लक्ष, बरबसपुरा येथे ७४ लक्ष आणि चारगाव येथे ७७ लक्षाच्या निधीतून भूमिपूजन सोहळा ३१ मार्च रोजी खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते पार पडला.
या अभियानांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला स्वयंपाक आणि घरगुती वापरासाठी सोयीच्या ठिकाणी नेहमी आणि सर्व परिस्थितीत स्वच्छ, पुरेसा आणि शाश्‍वत पाणीपुरवठा करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. २0२४ पयर्ंत देशातील ग्रामीण भागातील कुटुंबांना प्रति व्यक्ती किमान ५५ लिटर दजेर्दार पाणी पुरवणे आणि आदिवासी पाडे, शाळा, अंगणवाड्या, वसतिगृहे इत्यादींना नळ जोडणी देण्याचे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
भूमिपूजन कार्यक्रमावेळी प्रामुख्याने माजी आ. रमेश कुथे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा परिषद सभापती रुपेश कुथे, पूजा शेठ, जि प सदस्य वैशालीताई पंधरे, बरबसपुरा सरपंच लिविंग डोंगरे, चारगाव सरपंच ज्योती नागपुरे, कटांगटोला सरपंच हंसलाल उके, पं सदस्य सोनुलाताई बारेले, झमेंद्र नागपुरे, जेमल बेग, ओंकार नागपुरे, बिजलाल टेंभेरे, प्रशांत बोरकुटे, धर्मेंद्र नागपुरे, वजीर बिसेन, रमेश सोमवे, गजेंद्र फुंडे, देवचंद नागपुरे, सुनील टेंभेरे आदी उपस्थित होते.