अर्जुनी मोरगावजवळ विचित्र अपघातात वाहन 100 फुटावर फेकले गेले

0
54

अर्जुनी मोरगाव -येथील वडसा-कोहमारा मार्गावर अर्जुनी शहराबाहेर सोमवारी सकाळी विचित्र अपघात घडला. चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला.वाहन चक्क 1०० फूट अंतरावर शेतात फेकले गेले.वाहनातील इसम  बाहेर पडून हवेत उडाला व वाहनापासून सुमारे १०० फुटावर जाऊन पडला. यात डेव्हिड धनराज रहेले १९ रा अर्जुनी मोरगाव याचा मृत्यू झाला.डेव्हिड हा प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे समजते. यात गाडीचा चकनाचूर झाला आहे. या अपघातातून एक जण बचावला.अपघातग्रस्त वाहनाचा क्र एम एच ३५ ए जी ९९७७ आहे.