मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा व सत्कार समारोह

0
29

गोरेगांव:- जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार येथे दिनांक 2 एप्रिल रविवारला पालक मेळावा व सत्कार समारोह कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य ससेंद्र भगत, दीपप्रज्वलक पंचायत समिती सदस्य शितलताई बिसेन, प्रमुख मार्गदर्शक सांख्यिकी अधिकारी रुपेशकुमार राऊत, केंद्रप्रमुख मुंडीपार एस.एच. शहारे,सरपंच प्रेमलता राऊत, उपसरपंच बी.जी कटरे, ग्रामपंचायत सदस्य जावेद (राजा) खान, चंद्रशेखर शहारे, दिनेश दीक्षित,चुन्नीलाल चाचेरे,माधुरी चौधरी,सरिता सुरजोसे,शामकला खांडवाये,आम्रपाली राऊत,भुमेश्वरी पारधी,संगिता सरजारे,अध्यक्ष से.सह.संस्था खेवराम डाहाके,अध्यक्ष तंमुस गिरिश पारधी,तलाठी रजनी धमगाये,अध्यक्ष शाळा व्यव.शारदा राऊत,उपाध्यक्ष शाळा व्यव.राजु सिंदीमेश्राम,आणि सर्व सदस्यगण,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,मानवाच्या जिवनात शिक्षण हे फार मोलाचे आहे.मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थि असतो.असे प्रतिपादन केले.उद्घाटक,दीपप्रज्वलक यांनी शिक्षणाचे महत्व समजावुन सांगितले.प्रमुख मार्गदर्शक रुपेशकुमार राऊत यांनी विद्यार्थी जिवनातुन माणुस कसा पुढे जातो या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.एच.एस.शहारे यांनी पीएमश्री शाळा याविषयी सविस्तर माहिती सांगितली.या कार्यक्रमात याच शाळेतून शिक्षण घेऊन विविध विभागात कार्यरत असणारे व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारमुर्ती ए.डी.पठाण व नरेन्द्र डाहाके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पालकांचा उत्कृष्ट सहभाग मिळाला.सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.एम.काठेवार तर संचालन ग्रा.पं.सदस्य दिनेश दिक्षीत व आभार ओ.आर.मेश्राम यांनी मानले.