गोंदिया – नाभिक समाज हा संतांच्या विचारांचा मान ठेवून जातीभेद न पाळता सलून व्यवसाय करुन सर्वांना स्वच्छ व निरोगी ठेवणारा अल्पसंख्यांक समाज असून पंच्याहत्तर टक्के आर्थिक दृष्ट्या मागास तथा भूमिहीन पण तेवढाच आहे. नाभिक समाजाचा संपूर्ण भविष्य हे सलून व्यवसायावरच अवलंबून असल्यामुळे भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना जास्तीत जास्त शिक्षणासाठी आग्रह करुन सर्वांनी आपसातील मतभेद विसरुन शासकीय योजना मिळवून घेण्यासाठी आधी समाजात एकता टिकवून ठेवण्यासाठी संतांच्या विचारांचा आदर नेहमी कायम ठेवणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भुमेश मेश्राम यांनी केले.
ते कामठा परिक्षेत्र नाभिक समाज संघटनेच्या वतीने आयोजित नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराजांच्या जयंती समारोह महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी उदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज नागपुरे, एयर पोर्टचे अधिकारी श्री शिरपत, पं. स. सदस्या कला भेंडारकर, सरपंच रेखा जगने, सोनुला बरेले, उपसरपंच उमेशसिंग पंडेले, डॉ. उमेंद्र गजभिये, सुभाष गायधने, सदुलाल शेंडे, सलून संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप लांजेवार, जिल्हा सचिव सतिश साखरकर, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाय. पी. लांजेवार, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चन्ने, उपाध्यक्ष प्रविण तयकर, मुख्य संघटनेचे तालुकाध्यक्ष हेमंत कौशल, उपाध्यक्ष कैलाश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष चुन्नीलाल सूर्यवंशी, शहर अध्यक्ष दिनेश फुलबांधे, मुरली नागपुरे, नानू लांजेवार, आमगाव महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षा संगीता वाटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित पाहुणे मंडळी आणि समाज मंडळी या सर्वांनाच संत सेनाजी महाराजांचे फोटो सस्नेह भेट म्हणून देण्यात आले असून सर्वांनी संत शिरोमणी सेनाजी महाराजांची मुर्ती स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली, हे विशेष.प्रास्ताविक युवा तालुकाध्यक्ष अजय शेंडे, संचालन पोलिस पाटील मनमोहन श्रीवास यांनी केले असून उपस्थित सर्वांचे आभार कामठा परिक्षेत्र अध्यक्ष गुड्डू मेश्राम यांनी मानले.यशस्वीतेसाठी दिनेश जामतकर, प्रकाश शिवणकर, शैलेश मानकर, बाबुलाल शेंडे, संजू शेंडे, प्रकाश शेंडे, कैलाश शेंडे, योगेश शेंडे, विरेंद्र मानकर, सोविंद मानकर, विष्णू लांजेवार, राजू शेंडे, सोनू लांजेवार, बंडू लांजेवार, रविंद्र लक्षणे, सुरेश फुकटकर, सोनू शेंडे, किरण शेंडे, पल्लवी शेंडे आणि इतर समाज बांधवांनी सहकार्य केले.





