25.4 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home विदर्भ अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना घेऊन प्रकल्प अधिकार्यांना निवेदन

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना घेऊन प्रकल्प अधिकार्यांना निवेदन

0
32

तिरोडा,दि.27ः महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक तिरोड़ाच्यावतीने अंगणवाडी सेविका,सहाय्यिका व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांना घेऊन बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ हौसलाल रहांगडाले,जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटींग,जिवनकला वैद्य,दुर्गा संतापे,मिनाक्षी पटले,वंदना पटले,कविता पारधी,वर्षा डोंगरे आदी उपस्थित होते.निवेदन देतेवेळी प्रवासभत्यासह इंधनबिल,मानधन व पेंशनमुद्यावर चर्चा करण्यात आली.