24.2 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ शाश्वत स्वच्छता टिकवून गावांचा विकास साधा – मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील

शाश्वत स्वच्छता टिकवून गावांचा विकास साधा – मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील

0
38

* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी
गोंदिया – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत अनेक गावांनी विकास साधला आहे. मात्र गावांनी क्षणिक विकास न साधता शाश्वत स्वच्छता टिकवून आपल्या गावाला चिरकाल स्पर्धेत टिकवून ठेवा, असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2022-23 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत असून दिनांक 25 एप्रिल 2023 ते 27 एप्रिल 2023 या दरम्यान जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी ग्रामपंचायतींना भेटी देऊन तपासणी केली असता उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी 53 जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांक असलेल्या 53 ग्रामपंचायतीपैकी गुनानुक्रम सर्वोत्कृष्ट 9 ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. यात 25 एप्रिल रोजी देवरी तालुक्यातील डवकी, सालेकसा तालुक्यातील भजेपार, आमगाव तालुक्यातील तिगाव, 26 एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा, लाखेगाव, धादरी/उमरी तर 27 एप्रिल रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी/राम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चांनना/बा, येगाव या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. तपासणी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, सदस्य सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नरेश भांडारकर, समिती सदस्य तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) तसेच प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अगरवाल, प्रभारी उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी व विस्तार अधिकारी विनोद जाधव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा समन्वयक भागचंद रहांगडाले व इतर समिती सदस्यांनी केली. यावेळी देवरी गटविकास अधिकारी दीपक ढोरे, विस्तार अधिकारी पराते, विस्तार अधिकारी झामरे, गट समन्वयक भिमराज पारधी, सालेकसा विस्तार अधिकारी निमजे, समूह समन्वयक महेश वाढई, शोभा डोये, आमगाव गटविकास अधिकारी अर्चना अयाचित, विस्तार अधिकारी पंचायत कुटे, के. एम. रहांगडाले, गट समन्वयक गांधी पटले, तिरोडा गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे, विस्तार अधिकारी पंचायत शितेश पटले, विस्तार अधिकारी धारगावे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे अतुल गजभिये, गट समन्वयक राठोड, समूह समन्वयक पटले, छाया बोरकर, अनुप रंगारी, सडक अर्जुनी गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, आरोग्य सहायक कटरे, गट समन्वयक राधेश्याम राऊत, भुमेश्वर साखरे, अर्जुनी मोरगाव गटविकास अधिकारी विलास निमजे, विस्तार अधिकारी मोरेश्वर धोंगडे, गट समन्वयक अंबुले, समूह समन्वयक उमेंद्र भगत आदी उपस्थित होते.