
देसाईगंज,दि.30ः तालुका विधी सेवा समिती देसाईगंज अंतर्गत खटला पूर्व प्रकरणे नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणांत वादी व प्रतिवादी यांच्यातील वाद समोपचार व सलोख्याने मिटविण्यासाठी आज 30 एप्रिल रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, देसाईगंज येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकुण 28 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.पुर्ण प्रकरणांमध्ये रक्कम रु.303327.47 रुपयांची दंड वसुली करण्यात आली.
या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये खटलापुर्व 8 नियमित फौजदारी व दिवाणी खटला प्रकरणांचे 19 मामले असे एकुण 27 मामले मिटवून यात एकुण 303327.47/- रुपये वसूल करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीला पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधिश तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी सी.पी.रघुवंशी (क. स्तर) ,पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता मंगेश शेंडे हे होते.तसेच अॅड. संजय गुरु, अँड मंगेश शेंडे, अँड बी. एम. बांबोळकर, अड. लाँगमार्च खोब्रागडे, अॅड दत्ता पिलारे, अॅड प्रमोद बुध्दे व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देसाईगंज न्यायालयातील वित्त / आस्थापना विभागाचे सहाय्यक अधिक्षक ए. एल. आमटे, लघुलेखक व्ही. एस. महल्ले, वरिष्ठ लिपीक चेतन भुर्रे, कनिष्ट लिपीक प्रविण माटे, कनिष्ठ लिपीक नरेंद्र लोंढे, कनिष्ठ लिपीक श्रीमती एस. यु. गावंडे, कनिष्ठ लिपीक अजय कागदेलवार, कनिष्ठ लिपीक आर.आर.परसा, शिपाई पी. के. चालुरकर, शिपाई पुष्पा दासरवार, कारकुन प्रविण मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणांचा लवकर लागत असल्याने दिवसेंदिवस निपटारा लोकअदालतीत ठेवण्यात येणा-या प्रकरणांची संख्या वाढत चालली आहे.




