गोंडमोहाळीचे सात सदस्य अपात्र

0
10

तिरोडा -तालुक्यातील गोंडमोहाळी ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिले. सर्व सदस्यांना आदेशाची प्रतही पाठविली.
मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (१) ह अन्वये गोंडमोहाळी ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणूक दि.२५/७/१५ रोजी झाली होती. दि.२७/७/१५ रोजी मतमोजणी करण्यात आली.दि.७/८/१५ ला सरपंच-उपसरपंचाची निवड झाली.यात पौर्णिमा सदनलाल वाडगाये सरपंचपदी व उपसरपंचपदी सुभाष बाबुराव कावडे यांची निवड झाली.पण ग्राम अधिनियम १९५८ कलम १४ व नुसार खर्चाचा हिशेब देणे अनिवार्य आहे. मात्र या सदस्यांनी ४५ दिवस होऊनही निवडणुकीचा हिशेब दिला नाही.
याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व ग्राम पंचायत सदस्य जागेश्‍वर निमजे आणि इतर चार लोकांनी सरपंच पौर्णिमा वडगाये, उपसरपंच सुभाष कावडे, पुष्पा बोपचे, ममता बोपचे, प्रभा राऊत, धनवंता भगत, भूमेश्‍वर शेंडे यांच्याविरूद्ध याचिका अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या न्यायालयात दि.१0/८/१५ ला दाखल करण्यात आली होती. निकाल लागल्यानंतर ३0 दिवसाच्या आत हिशेब देणे महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागाचे शासन परीपत्रक दि.२९/३0२0१२ अन्वये बंधनकारक असताना त्यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले.