गोंदियाच्या शासकीय रक्तपेढीची एफडीआयकडून चौकशी

0
9

गोंदिया: रक्त हा मानवी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान असल्याचे सांगितले जाते. त्याला समाजाकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. पण या शिबिराच्या माध्यमातून गोळा होणाèया रक्तावरही चक्क शासकीय रक्तपेढीतच गैरव्यवहार होत असेल, तर ही मोठी qचतेची बाब आहे. गोंदियाच्या शासकीय रक्तपेढी संदर्भात साप्ताहिक बेरारटाईम्सने गेल्या बुधवारच्या अंकात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या राज्याच्या अन्न व औषधी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून प्राथमिक चौकशीत किमान ५० ते ६० मुद्यांवर एफडीएने प्रश्नचिन्ह लावल्याचे वृत्त बाहेर आले आहे. दरम्यान, शासकीय रक्तपेढीतील रक्ताच्या पिशवीवरील एक्स्पायरी तारखेतही खाडाखोड होत असल्याचे चौकशीपथकाच्या निदर्शनात आल्याची माहिती आहे.
एखाद्या व्यक्तीच्या आजारात, शस्त्रक्रियेत वा अपघात घडला तेव्हा रक्ताची महती लक्षात येते. मानवी जीवन वाचविण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. पण त्या रक्ताचे जतन करणाèया संस्था या आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावत नसतील तर तोच रक्त रुग्णासाठी धोकादायक सुद्धा होऊ शकतो आणि दानदात्याने केलेले रक्तदान वाया जाऊ शकते. रक्त हे अमूल्य आहे, याचे भान संबंधित रक्तपेढीच्या संचालकांनी ठेवले पाहिजे. पण गोंदिया शहरात असे होताना दिसत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. गोंदियाच्या शासकीय रक्तपेढीत बोकाळलेला गैरव्यवहार हा सर्वांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.
येथील शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयात असलेली रक्तपेढी कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमी चर्चेत राहत आली आहे. यापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांना रक्त देताना पैशाची थेट मागणी होत असल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आला होता. सोबतच इतर कारणाने चर्चेत असलेल्या या रक्तपेढीतून २७ फेब्रुवारीला प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या पतीला मुदतबाह्य रक्त देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.त्यानंतर ७ एप्रिल रोजी पुन्हा एक नवा प्रकार समोर आला तो म्हणजे शासकीय रक्तपेढीत ६ एप्रिल रोजी संकलित करण्यात आलेल्या रक्ताच्या पिशवीवर एक्स्पायरी तारीख ही १०.१५.६ अशी लिहिलेली आहे. या पिशवीमध्ये ‘ओ ‘पॉझिटिव्ह हे रक्त असून रक्तसंकलन पिशवी क्रमांक १५९५ असे आहे. यावरून रक्तपेढीत किती सावळा गोंधळ सुरू आहे, हे दिसून येते. दोन दिवसापूर्वीच गोंदियाच्या शासकीय रक्तपेढीतील रक्त पिशवीवर एमआरपीचा उल्लेख नसल्याचे वृत्त बेरार टाईम्स ने प्रकाशित केले होते. त्यानंतर पुन्हा एक्स्पायरी तारखेतही घोळ केला जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
उल्लेखनीय म्हणजे रक्तपेढीची जबाबदारी सांभाळणाèया डॉक्टरांना कार्यमुक्त केल्याने या रक्तपेढीचा कार्यभार रामभरोसे चालत आहे.
बाई गंगाबाई महिला रुग्णालयातून गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. या शासकीय रक्तपेढीतून खासगी रुग्णालयातील रुग्णांना रक्त पुरवठा करण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, या रक्तपेढीतून रक्ताची मागणी करणाèया रुग्णांच्या नातेवाइकांकडून त्या रक्ताच्या पिशवीचा मोबदला घेतला जातो. अशा प्रकारे घेतल्या जाणाèया रक्ताची qकमत ठराविक असताना आणि किंमत पिशवीवर मुद्रित करणे बंधनकारक असताना पिशवीवर खाडाखोड वा qकमत न टाकता गरजूंकडून अव्वाच्या सव्वा मोबदला उकडण्याचा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. एवढेच नव्हे तर रक्ताच्या पिशवीवरील रक्तगट आणि तो वापरण्याची महत्तम कालावधी दर्शविणारी तारीख यातही मोठ्या प्रमाणावर खाडाखोड केली जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांना केला होता. या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाèयांनी गेल्या ६ तारखेला या रक्तपेढीतील अनियमितांची चौकशी सुरू केली. या चौकशीत तपास अधिकाèयांनी किमान ५० -६० मुद्यांवर हरकत घेतल्याची माहिती आहे. एफडीएच्या चौकशीत अनेक मुद्दे समोर येतील, अशी चर्चा आरोग्य विभागाच्या वर्तुळात सुरू आहे.