साठवण बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करा

0
22

सालेकसा : सालेकसा तालुक्यातील साठवण बंधाऱ्यांच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषद पिपरियाच्या कार्यक्षेत्रातील महाराजीटोला, धनेगाव, कचारगड, कोसमतर्रा व अन्य भागात साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामात निकृष्ठ दर्जाच्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारासोबत संगणमत करून हा प्रकार केल्याचे समजते. दरम्यान, कृषी विभागांतर्गत या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निकृष्ठ दर्जाच्या होत असलेल्या कामाची निश्चितपणे चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.व्ही.एन. कुंभारे, तालुका कृषी अधिकारी, सालेकसा