जिल्हा परिषद कर्मचार्यांची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढा

0
23

गोंदिया,दि.09-प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यावर जिल्हा परिषद गोंदिया प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी. शहारे यांचे नेतृत्वात दिनांक 9 मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,लिपिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर,सुभाष खत्री आदी उपस्थित होते.
ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्ष पूर्ण झाली.त्यांचीच प्रशासकीय बदली करावी, दहा वर्षाच्या आतील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली करण्यात येऊ नये.अंतर्गत विभाग बदलीची कार्यवाही करण्यात यावी.तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात यावी.बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.नियमित पदोन्नती / कालबध्द पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात यावे या आणि इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.