खुर्शिपार येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

0
24

आमगाव: तालुक्यातील मौजा खुर्शिपार येथील श्री हनुमान मंदिर परिसरात गावकऱ्यांच्या सहकार्यातून दिनांक १९ मे ते २७ मे २०२३ पर्यंत नऊ दिवसीय संगीतमय श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह व श्री शिवपरिवार प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानयज्ञ सप्ताहा दरम्यान दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत पूजा व नित्य रुद्राभिषेक तसेच सकाळी १० ते ११ वाजे दरम्यान रुद्र हवन यज्ञाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
१९ मे रोजी सकाळी ९ वाजता कलश यात्रा, भागवत यात्रा, घट स्थापना, वेदी पुजन, मूर्ती जलाधिवास ई. कार्यक्रम तसेच २० मे ते २६ मे पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते ९ वाजता पर्यंत श्रीवृंदावन धाम येथील प्रसिद्ध वास्तू, कुंडली विशेषज्ञ व भागवत कथा वाचक आचार्य श्रीपवनदेवजी महाराज यांचे कडून संगीतमय कथा महात्म्य सांगण्यात येईल. दि.२७ मे रोजी सकाळी ८ वाजता शिव परिवार मूर्ती नगर भ्रमण यात्रा उत्सव, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मंदिर पुजन, गीता पाठ ज्ञानकथा, हवन पूर्णाहुती व सायंकाळी महाप्रसाद चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.
यु ट्यूब च्या /@shaktibhaktitv चैनल वर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असून यावेळी आयोजित कलशयात्रा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला भावीक भक्तांनी आयोजन समिती कडे आगावू नाव नोंदणी करावी व परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने कलश यात्रा व कथायज्ञ कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन खुर्शिपार ग्रामवासी व आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.