39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ हत्येच्या निषेधार्थ आलापल्लीत कडकडीत बंद

हत्येच्या निषेधार्थ आलापल्लीत कडकडीत बंद

0
18

आलापल्ली, -: अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या अंगरक्षकाच्या हत्येच्या निषेधार्थ आज आलापल्ली शहरातील दुकानदार व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली.

काल(ता.१४) छल्लेवाडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान माजी आमदार दीपकदादा आत्राम यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे यांची नक्षल्यांच्या अॅक्शन टीमने गोळया घालून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ आज व्यापारी व दुकानदारांनी सकाळपासूनच आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला. दरम्यान, घटनेला चोवीस तास उलटूनही पोलिस प्रशासनाने दीपकदादा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ केलेली नाही.

blank