गोंदिया पालिकेच्या विरोधीपक्षनेत्यावर रुग्णालयात गोळीबार

0
5
प्रकृती चिंताजनक,पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गोंदिया- गोंदिया नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते पंकज सुंदरलाल यादव यांच्यावर आज शुक्रवारला रात्री 9 वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर हल्ला केला.विशेष म्हणजे यादव यांच्या कक्षाबाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था केलेली असताना हा हल्ला झालाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.यादव यांच्यावरील हल्यामुळे गोंदिया शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पेट्रोलपंपपासून ते हाॅटेलपर्यंत सर्व प्रतिष्टाने बंद करण्यात आली आहेत.त्यातच गोंदिया शहरात आज रामनवमीनिमित्त ुसुरु असलेल्या शोभायात्रचा समारोप सुध्दा मध्येच थांबवून करण्यात आला.
पंकज यादव यांच्यावर नगरपरिषदेचे सफाई कामगार नेते छेदीलाल इमलाह यांच्या हत्येचा आरोप असून ते याप्रकरणात आरोपी आहेत.न्यायालयात शरण येण्याएेवजी त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते कुवरतिलंकसिह जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाले.तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते.गेल्या अनेक दिवसापासून ते रुग्णालयात दाखल होते यापुर्वी सुध्दा एकदा रुग्णालयात त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या अपवेने शहरात तणावाची स्थिती व रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.परंतु आज अचानक यादव यांच्यावर झालेल्या गोळीबाराने परिस्थिती चिघळली असून गोळी त्यांच्या पोटाला लागून गेल्याचे सुत्रानी म्हटले आहे.