आदिवासी वसतिगृहातील वैशाली व हेमलता यांची कॉन्स्टेबलपदी निवड

0
13

गोंदिया,दि.11 – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, जि. गोंदिया अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह देवरी क्र.२ येथील वैशाली मुलचंद पदे व हेमलता सदाराम पदे या विद्यार्थीनींनी सन २०२२-२३ या सत्रामध्ये अत्यंत गरीब परिस्थीतीवर मात करुन पोलीस कॉन्स्टेबल या पदावर यश संपादन करुन आपल्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण केले. या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या दोघी एकाच कुटुंबातील बहिणी (चुलत) आहेत.

 नक्षलग्रस्त व दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्हयातील देवरी प्रकल्पातील चुंभली या आदिवासी बहुल ग्रामीण भागातील या दोघी एकाच कुटुंबातील बहिनींनी अतुलनीय असे यश संपादीत केले आहे. या विद्यार्थिनींनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली. त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

         गोंदिया जिल्हयातील देवरी प्रकल्पांतर्गत विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी याच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे विविध पुस्तके उपलब्ध करुन देवुन विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. प्रकल्प अधिकारी यांचे हस्ते शाल, श्रीफळ देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.

        याच पदावर न थांबता वरिष्ठ पदावर जाण्यासाठी प्रयत्न करावे अशा शुभेच्छा राचेलवार यांनी दिल्या.  वैशाली मुलचंद पदे व हेमलता सदाराम पदे यांनी मिळविलेल्या यशाचे अन्य विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे असे त्यांनी सांगितले.  शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह देवरी येथील श्रीमती एस. एल. देवगडे, गृहपाल यांनी सुध्दा वेळोवेळी विद्यार्थ्यांनीचा अभ्यास घेवुन यश संपादन करण्यासाठी जबाबदारी चोखपणे पार पाडली. निवड झालेल्या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय प्रकल्प अधिकारी, गृहपाल, एच.आर. सरीयाम सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अरुण सुर्यवंशी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांचेसह पालकांना दिले आहे.