Home विदर्भ डॉ. श्री.भा. जोशी यांच्या हस्ते वानखडे यांच्या दोन साहित्यकृतींचे रविवारी प्रकाशन

डॉ. श्री.भा. जोशी यांच्या हस्ते वानखडे यांच्या दोन साहित्यकृतींचे रविवारी प्रकाशन

0

गोंदिया : सुप्रसिद्ध कवी, कथाकार आणि चित्रकार प्रा.नंदू वानखडे यांच्या ‘ज्याला नाही माय’  या कथा संग्रहाचा तसेच ‘अंतर्मनातील आंदोलने’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, १४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता गोंदियातील ‘संथागार विहार’ येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रा. नंदू वानखडे हे वाशिम जिल्ह्याच्या मुंगळा येथील रहिवासी असून सध्या गोंदियाला आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे पूर्व अध्यक्ष तथा ख्यातनाम संवाद तज्ञ आणि समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते  दोन साहित्य कृतींचे प्रकाशन होणार आहे.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक युवराज गंगाराम राहणार असून सदर साहित्य कृतींवर सुप्रसिद्ध कवी, कथाकार, चित्रकार प्रमोदकुमार अणेराव आणि कवी, नाटककार प्रा. डॉ.सुरेश खोब्रागडे हे भाष्य करणार आहेत. तर ‘मी नव्या युगाची सावित्री’ या प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेली कु. जुही नंदू वानखडे संचालन करणार आहे. या प्रसंगी साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती उषाकिरण आत्राम, माणिक गेडाम, कालिदास सूर्यवंशी, बापू इलमकर, किरणकुमार इंगळे, डॉ.सविता बेदरकर, प्रा.मिलिंद रंगारी, प्रा.राहुल तागडे, प्रा.भगवान साखरे, वैशाली वानखडे, जी.जी.तोडसाम, किरण मोरे, उमा गजभिये आणि गीता वानखडे आदी साहित्य साधकांनी केली आहे.

Exit mobile version