पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गोंदिया जिल्हा दौरा

0
19

गोंदिया, दि.18 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवार दिनांक 20 मे 2023 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने साकोली (जि.भंडारा) कडे प्रयाण. सकाळी 9.20 वाजता साकोली येथे आगमन व मोटारीने नागझिराकडे प्रयाण. सकाळी 9.40 वाजता नागझिरा येथे आगमन व वन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता मोटारीने नागझिरा येथून साकोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता साकोली येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुरकूटडोह जि.गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता मुरकूटडोह येथे आगमन व मुरकूटडोह आर्मड आऊटपोस्ट लोकार्पण समारंभास उपस्थित राहून दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.