मूलभूत सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सदैव प्रयत्नशील – सभापती संजय टेंभरे

0
22

* फुलचुर येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
गोंदिया – फुलचुर मतदार संघातील क्षेत्रात अजूनही मूलभूत सोयी सुविधांची वानवा आहे. या भागातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असल्याने या भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, नाली, सांडपाण्याची व्यवस्था यासह मूलभूत सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सदैव प्रयत्नशील राहणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषद गोंदियाचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले.
फुलचुर येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून 10 लाख रुपयांच्या निधीतून जमीनदार वाडा समोरून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर, पंचायत समिती सदस्य स्नेहा गौतम, उपसरपंच सुरेंद्र सोनवणे, माजी ग्राम पंचायत सदस्य देवचंद बिसेन, होमेंद्र देवगडे, मुकेश नाईक, सीताराम बिसेन, सुनिल बोपचे, उर्मिला रहमतकर, गजेंद्र नाईक, संभुजी बिसेन, अमोल बिसेन, धर्मेंद्र देवगडे, शंकर बिसेन, सरस्वती नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य सुकचंद येडे, संपत भाऊ बिसेन आदी उपस्थित होते.
फुलचुर ग्रामपंचायत अंतर्गत आंबाटोली या भागात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागात अजूनही हव्या तश्या सुविधा उपलब्ध नसल्याने नागरी सुविधा योजनांच्या माध्यमातून या भागातील समस्या ही लवकरच सोडविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.