ओबीसी जनगणनेकरीता 26 नोव्हेंबरला निघणार ओबीसींचा विराट मोर्चा

0
24

गोरेगाव,दि.22-येत्या संविधानदिनी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावे यासह ओबीसींना कलम 340 नुसार सर्व अधिकार देण्यात यावे या मागणीला घेऊन राज्यव्यापी विराट मोर्च्याचे आयोजन नागपूरच्या विधानभवनावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या विराटमोर्च्याच्या नियोजनासह 30 जुर्लेपासून दोन टप्यात सुरु होणार्या मंडल यात्रेबद्दल गोरेगाव येथील एमसीपी विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्ता बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीला ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष बळीराज धोटे,स्टुडटंस राईटस असो.चे अध्यक्ष उमेश कोराम,ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,अशोक लंजे,ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ओबीसी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत ओबीसी आंदोलनाला व्यापक रुप देत ओबीसी जनगणनेकरीता केंद्रसरकारवर दबावगट निर्माण करणे.7 ऑगष्ट  मंडल आयोग दिन म्हणजे ओबीसी अधिकार दिन म्हणुन साजरा करणे.महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येत असलेल्या ओबीसी,एस.बी.सी,विजे,एनटी,विद्यार्थीच्या योजंना विद्यार्थ्यापर्यंत पोचवणे आणि ओबीसी हिताकरीता निघणार्या मंडल यात्रेला यशस्वी करण्यासोबतच चंद्रपूर येथील समारोप कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ओबीसींना उपस्थित राहण्याचे आवाहन उमेश कोराम यांनी केले. ओबीसींच्या सांविधानिक अधिकाराकरीता 26 नोव्हेंबर 2023  संविधान दिवसाला भव्य विराट मोर्च्यात सर्व महीला,विद्यार्थी,शेतकरीबांधवाना सहभागी करुन घेण्याकरीता गावागावापर्यंत हा संदेश पोचविण्याचे आवाहन बळीराज धोटे यांनी केले.बबलु कटरे यांनी ओबीसी शेतक-यांची पिढवणुक सरकार कशा पध्दतीने करते यावर सविस्तर माहीती दिली.ओबीसी वर्ग धर्म व मुस्लिम विरोधात जास्त विचार करतो पण स्वतःच्या अधिकारांसाठी एकत्रित येत नाही.ही शोकांतिका आमच्या ओबीसीची असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.बैठकीचे प्रास्तविक ओबीसी सेवा संघाचे राज्यउपाध्यक्ष सावन कटरे यांनी केले.तर संचालन तालुका महासचिव भुमेश ठाकरे यांनी केले.आभार जिल्हा मार्गदर्शक विनायक येडेवार यांनी मानले.