घट-तुटीचे आणि खरेदीच्या कमीशनाचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत धान खरेदी नाही

0
27

आदिवासी संस्थांचा संघाच्या तिसर्‍या बैठकीत निर्णय

देवरी,ता.२२: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा संघ गोंदिया जिल्ह्याची बैठक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उप प्रादेशिक कार्यालय देवरीच्या सभागृहात रविवार (ता.२१ मे ) रोजी घेण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्था संघाचे अध्यक्ष शंकर मड़ावी हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे संचालक भरतसिंग दुधनांग प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीतआदिवासी संस्थेच्या धान खरेदी संदर्भात अनेक विषयांतर्गत चर्चा करून सर्वानुमते असे ठरविण्यात आले की जो पर्यंत शासन आणि आदिवासी महामंडळ हे आदिवासी संस्थेनी केलेल्या धान खरेदीचे घट -तुट आणि आता शासनाने घोषीत केलेले धान खरेदी चे घट-तुट चे प्रश्न तसेच धान खरेदीचे कमिशन २० टक्क्याहुन अधिक वाढवून म्हणजे ३० टक्के पेक्षा जास्त म्हणजे ५० टक्के पर्यंत वाढवून आदिवासी संस्थांचे अडचणी व जो पर्यंत आमच्या समस्या सोडवित नाही तो पर्यंत धान खरेदी केली जाणार नाही असा निर्णय गोंदिया जिल्ह्यातील सर्व आदिवासी सहकारी संस्थेनी बैठकीत घेतला आहे.या निर्णयावर आदिवासी संस्था ठाम आहेत.
आदिवासी संस्थेच्या संघाची मागणी असी आहे की, घट-तुट धान साठवणुक कालावधी प्रमाणे देण्यात यावे, खरेदी केलेला धान त्वरीत उचल करण्यात यावे, संस्थेचा कमीशन वेळेवर देण्यात यावे, अनुसंगीक खर्च वेळेवर देण्यात यावे, गोदाम भाड़े वेळेवर देण्यात यावे, बारदाना वेळेवर देण्यात यावे, कमीशन च्या रक्कमेत ३० रुपयेत वाढ करुन ५० रुपये क्विंटल मागे देण्यात यावे, मंडी-लेबर चार्ज मध्ये वाढ करुन वेळेवर देण्यात यावे, धान खरेदी उद्दीष्टाची अट काढुन, खरेदी केन्द्राचे रजिस्ट्रेशन प्रमाणे एकाच वेळी उद्दीष्ट देण्यात यावे, एका कट्यात ४० किलो धान येत नसल्यामुळे नवीन पोत्याची गोणी मोठी करण्यात यावे, गोदाम भाड्यात वाढ करुन दोन महिने ऐवजी धान साठवणुक कालावधी प्रमाणे देण्यात यावे.
वरील प्रमाणे संस्थांच्या मागण्या शासना कडुन सोडविण्यात यावे. संस्थांचे सदर मागण्या मान्य करण्यात आले नाही तर पुढील रब्बी हंगामा ची धान खरीदी जिल्ह्यातील कोणतीच संस्था धान खरेदी करणार नाही.असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
बैठकीत वसंत पुराम, भुवन नरवरे,प्रेमचंद गुप्ता, गोमतीताई तितराम, उत्तमराव मरकाम, हरीश कोहळे, मानीक बापू आचले, लक्ष्मण लटये, काशीनाथ रणे, सान्नू मडावी, जिवन सलामे, तुलाराम मारगाये, मदन रहिले, मनोहर हरिणखेडे, पतिराम भोगारे, प्रकाशबापू मडावी, विजय भोयर, दुर्योधन राऊत, लक्ष्मण किसमे, तेजराम धुर्वे, गणेश तोपे, राजुभाऊ राऊत, लोकनाथ तितराम, के.बी.करचाल, एस.डी. मडावी,जे. वी. सलामे, एम.वाय.गायकवाड, एम.व्ही.सोनवाने, राजेश कुंभरे, उमेश कुरसुंगे, एण.एस.मेळे, जे.बी.क्षिरसागर, एम.एस. शहारे, हिवराज फाफनवाडे, मार्तंड मेन्ढे, पि.व्ही. वरठे, एम.झेड.गावराने, देवलाल कटरे, विधायक मरसकोल्हे, रविन्द्र लोगडे, राकेश सोनवाने, जितेन्द्र बडवाईक,महेश फुंडे,रि.प. बहेकार, के. सी. गावळ, सचिन हेमणे, देवराव वलके, मन्सूर अली सय्यद, तसेच जिल्ह्यातील सर्व आदिवासी संस्थांचे अध्यक्ष व सचिव बहसंख्येने उपस्थित होते.