सभापती बंजार यांच्या शुभहस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन

0
23

देवरी – स्थानिक पंचायत समिती अंतर्गत पंधरयुक्त कामाचे भूमिपूजन आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा अंभोरा आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग दुधनाग यांच्या अध्यक्षतेखाली सभापती अंबिका बंजार यांच्या शुभहस्ते दि.२३ मे मंगळवारला विविध ठिकाणी विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यात तालुक्यातील कोसबी खुर्द येथे बोअर् करुन पंप लावणे, अंभोरा येथील जि. प. शाळा तथा अंगणवाडी येथे बोअर् करणे, इमारत दुरुस्ती आणि शौचालय बांधकाम तर, पिंडकेपार येथील अंगणवाडी क्रमांक – १ ची इमारत दुरुस्ती करुन डिजीटल करणे. या विविध कामांच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच यमुना शृंगकार, पोलिस पाटील दिनदयाल दुधकवरा, माजी पोलिस पाटील प्रल्हाद दुधनाग, अंभोरा आदिवासी संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार राऊत, सचिव मधुकर शहारे, प्यारेलाल बंजार, सोहनलाल घाटघुमर, आनंदराव कवास, नितेशज राऊत, महेंद्र घरत, गुणेश बडोले, इंजि. दिशांत चन्ने, इंजि. लोकेश लांजेवार आणि शेकडो गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.