आता बिसलेरी पितो पाणी-अनिरुद्ध वनकरांचा घोंगावला वादळंवारा

0
32

गोंदियात बुध्द जयंती महोत्सव उत्साहात

गोंदिया ता.24:-विश्वभूषण , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित बुद्ध जयंती महोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.’आता बिसलेरी पितो पाणी’ या भीम गीतावर श्रोते मंडळी स्तब्ध झाले होते,कारण या भीमगीताने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 1927 च्या महाडच्या संगराची प्रतिमा डोळ्यासमोर उभी केली होती.एकेकाळी आमच्या महापुरुषांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, आता त्यांच्याचं पुण्याईने “आता बिसलेरीचे पितो पाणी!”ही स्वाभिमानाने ठासून सांगण्यात गर्व वाटतो, असा हा संदेश होता.महाराष्ट्राचे प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीतांची ‘मैफल ‘श्रोत्यांना संदेश देऊन गेली!मुलांनी व्हाट्सअप, फेसबुक विद्यापीठापासून दूर राहावं असाही संदेश त्यांनी दिला.
‘जिंदगी हमारी फाईन है -क्यूँकी संविधानमे बाबासाहब की साईन है ‘असे सांगून 2024 च्या निवडणुकीत ही साईन अधिक प्रभावशाली आणि सुरक्षित राहण्यासाठी मनुवाद्याना सपशेल नाकारा असाही त्यांचा वादळवारा घोंगावला.

त्यांनी सादर केलेल्या भीमगीतांमध्य  दाराकडे वडली तुझ्या गौतमाची पाऊले.,कबीरा,)माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर -भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर, ए पोरा तू साहेब झालास मोठा -बाबासाहेबांच्या पुण्याईनं!
आदि संगिताने भीम गीतांची ‘मैफल ‘चांगलीचं सजली.
दरम्यान या उत्सव समितीचे अध्यक्ष आयु अक्षय वासनिक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयु. नानाजी शेंडे यांनी तथागत बुद्धांच्या मूर्तीला वंदन करून आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमात मोठया संख्येने बुद्धिस्ट समाज शामिल झाला होता. विश्वभूषण जयंतीच्या भीमसैनिकांचे शुभ्र वस्त्र तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक जयंतीच्या भीमसैनिकांचे ब्लॅझेर परिधान केलेले युनिफॉर्म यामुळे भीमसैनिकांचा स्वाभिमान उफाळून दिसत होता.या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे जयंतीचे अध्यक्ष आयु. अक्षय वासनिक यांचे उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केलं.