मुरकुटडोहवासीयांना हेलीकाॅप्टरचे दर्शन मात्र लालपरीचे दर्शन कधी होणार

0
19
गोंदिया- सातपुडा आणि मायकल पर्वताच्या त्रिकोणी संगमाच्या मधोमध घनदाट जंगलात वसलेली सालेकसा तालुक्यातील अतिसंवदेनशील आदिवासी वस्ती असलेली दंडारी आणि मुरकुटडोह 1,2,व 3 ही गावे.या माओवादग्रस्त भागातील या गावांत जाण्यासाठी आधी रस्ता नसल्याने जगापासून दुरावली होती.मात्र ही गावे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या डांबरी रस्त्याने जोडली गेली आहेत.त्या गावात आजपर्यंत गेल्या तीन वर्षात दोन -तीनदा हेलिकाॅप्टरचे दर्शन झाले,मात्र आम्हाला लालपरीचे अजून दर्शन न झाल्याने दरेकसा व सालेकसा येथे जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

सालेकसापासून सुमारे ३५ किलोमीटर दूर अंतरावर टेकाटोला, मुरकुडोह १, मुरकुडोह २, मुरकुडोह ३, दंडारी ही पाच गावे आहेत. पाचही गावांत गोंड समाजाचे तीन हजारांवर लोक वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात धान पिकाची लागवड करून हे आदिवासी आपली उपजिविका चालवितात. नंतर मोलमजुरी करून दिवस काढतात.तीन वर्षाआधी या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पायवाटेने पहाड पार करून दरेकसा गाठत असत.या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून धनेगाव-टेकाटोला-दलदलकुही-मुरकुटडोह १ पर्यंत १५.५ किमीचा डांबरी रस्ता बांधून तीन वर्ष लोटले.मात्र स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातही या गावातील नागरिकांना लालपरीचे अद्यापही दर्शन झालेले नाही. जाणार आहे.