राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन 29 मे रोजी

0
7

गोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विदर्भ प्रांत संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्ष (सामान्य) प्रशिक्षण वर्ग 14 मे पासून स्थानिक लिटिल वुड्स विद्यालयात सुरु आहे. सोमवार, दिनांक 29 मे रोजी प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे पथसंचलन शहरातील मुख्य मार्गाने होणार आहे. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता सिंधी शाळेच्या मैदानातून स्वयंसेवकांचे पथसंचलन सुरु होणार असून ते भवानी चौक, मोटवानी चेंबर, इसरका भवन चौक, दुर्गा चौक, सराफा लाईन, गोरेलाल चौक, गांधी चौक, चांदणी चौक, शंकर चौक मार्गे लिटिल वुड्स विद्यालयात पोहोचेल व समापन होईल.पथसंचलनाचे निरीक्षण रा. स्व. संघाच्या केंद्रीय अधिका-यांच्या उपस्थितीत सुनील केलनका व डॉ गंगाधर डूलानी यांचे निवासा समोर करण्यात येणार आहे.या वर्गाचा समापन समारोह दिनांक 3 जून रोजी सायंकाळी 6:00 वाजे वर्ग स्थानी लिटिल वुड्स विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.