अ.भा. सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी चंद्रकुमार बहेकार यांची नियुक्ती

0
26

गोंदिया: अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी भजेपार ग्राम पंचायतीचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, सचिवपदी खुर्शिपारच्या सरपंच एड. हेमलता चव्हाण, उपाध्यक्षपदी जब्बारटोला सरपंच मनीष सिंह गहेरवार, महिला जिल्हाध्यक्षपदी निंबाच्या सरपंच वर्षा विजय पटले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून लवकरच जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्य सल्लागार राजेंद्र कराडे यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ अध्यक्ष एड. देवा पंचभाई, पंचायत समिती गोंदियाचे सभापती मुनेश्वर रहांगडाले, एड. योगेश पारधी हायकोर्ट नागपूर, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पोवार होर्डिंग गोंदिया येथे जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांची सभा पार पडली. यावेळी जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सर्वांच्या संमतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संचालन गंगाझरीचे सरपंच सोनू घरडे तर आभार प्रदर्शन चारभाटाचे सरपंच कैलाश मरस्कोल्हे यांनी केले.