वरिष्ठ लिपीक मुकुंद पी.बागडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
41

गोरेगाव,दि.31ः-येथील पी.डी. रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरीष्ठ लिपिक मुकुंद पी.बागडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाॅ.टी.पी.येडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून एड.टी.बी.कटरे,यु.टी. बिसेन,प्राचार्य वाय.आर.चौधरी उपस्थित होते.सत्कारमूर्ती मुकुंद बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यात त्यांनी मी आज जरी सेवानिवृत्त होत असलो तरी पण आपल्या शाळेसाठी कधीच सेवानिवृत्त होणार नाही.ज्या ज्या वेळी माझी या शाळेला गरज आहे,तेंव्हा तेंव्हा मी आपल्या सोबत तत्पर असेन असे म्हणून सर्वांचे मन जिंकले.कार्यक्रमाचे संचालन सी.आर.बिसेन यांनी तर आभार ए.एच.कटरे यांनी मानले.कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षकांनी बागडेजी यांच्या कार्याविषयी माहीती सांगितली. एक उत्तम सहकारी आज सेवानिवृत्त होत आहे त्यांची कमी भरुन निघतं नाही तरीही त्यांना भावी जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात एस. पी. तीरपुडे, व्ही. पी. कटरे, ए.एस. बावनथडे,जे.एस.बिसेन, डी. बी. चाटे,आर. टी. पटले, ,वाय. के. चौधरी ,आर. वाय. कटरे, जी. ड्ब्लु. राहांगडाले, ए. जे. सोरले,भुमेश राहांगडाले,कोटांगले यांनी सहकार्य केले .