पाठय़पुस्तकातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळले

0
7

भंडारा : महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळून त्याऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द प्रयोग केला आहे. याचा बहुजन समाज पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. यासाठी जबाबदार अधिकारी व पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक घरडे यांनी केली आहे.
इयत्ता सहावी व आठवीच्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या हिंदी सुगम भारती पुस्तकात हा प्रकार उघडकीस आला आहे. संविधानाचे जतन करण्याची, सुरक्षा करण्याची नैतिक जबाबदारी शासनाची आहे. पण भाजप सरकार किंवा त्यांचे पदाधिकारी, अधिकारी असा प्रकार मुद्दाम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.