■ “हर हर महादेव” च्या गजराने दुमदुमले देवरी शहर.
—————————–
देवरी,दि.२७: जय श्री राम ग्रुप देवरीच्या वतीने आज रविवार (दि.२७ आगस्ट) रोजी तालुक्यातील वडेगाव येथील त्रिवेणी संगम महादेवघाट नदी वरून देवरी शहरातील नगरपंचायत नजीकच्या शिवमंदिरापर्यंत शिवकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेचे शुभारंभ या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि बळीराम कोटवार , नरेश राऊत, संदिप मोहबिया, सुधीर अग्रवाल, सुजीत अग्रवाल, अंतरिक्ष बहेकार, सोनू शाहू, व सारंग देशपांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
हि यात्रा वडेगाव घाटावरून कावड मध्ये जल भरूण “हर हर महादेव” चा गजरात पदयात्रा द्वारे देवरी शहरातील शिव मंदिरात पोहचून या ठिकाणी शिवदेवाचे सामुहिकरित्या महा जलाभिषेक व महाआरती करण्यात आले.नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. अशाप्रकारे देवरी शहर “हर हर महादेव” च्या गजराने पूर्ण देवरी शहर दुमदुमले.
या यात्रेच्या आयोजनार्थ भोलू गुप्ता, दिपक शाहू, कुणाल कत्रे, सचिन राणा, राहुल शाहू, दुर्गेश शाहू, प्रज्योत भेंडारकर, मुकेश रक्षणवार यांच्यासह शहरातील सर्व शिव भक्तांनी सहकार्य केले.