गोंदिया पब्लिक शाळेच्यावतीने रामनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात

0
19

गोंदिया,दि.28ः रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंदिया पब्लिक शाळेच्या वतीने समाजात कायदा व सुव्यवस्था स्थापित करणाऱ्या पोलीसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यासोबत रक्षाबंधन उत्सव शाळेतील प्री – स्कुलच्या लहान मुला – मुली सोबत पोलीस स्टेशन रामनगर येथे साजरा करण्यात आला. सदर रक्षाबंधन उत्सव दरम्यान गोंदिया पब्लिक शाळेतील लहान मुलानी गीत गायन करुन पोलीस अधिकारी व अंमलदाराना राखी बांधले.सदर कार्यक्रमात गोंदिया पब्लिक शाळेतील शिक्षिका व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , सहा पोलीस निरीक्षक संजय सोने, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका देसाई, व पोलीस स्टेशन चे अंमलदार उपस्थित होते.